नीरा नरसिंहपूर (प्रतिनिधी) : महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष संग्रामसिंह प्रशांतराव पाटील यांची सोलापूर जिल्हा पक्षनिरीक्षक म्हणून निवड करण्यात आली. मुंबई येथील पक्ष कार्यालयात अजित पवार गटाचे प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष खासदार सुनील तटकरे, प्रदेश राष्ट्रवादी युवक अध्यक्ष सुरज चव्हाण, पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष राकेश कामटे यांच्यासह सर्व विभागीय अध्यक्ष, प्रदेश पदाधिकारी, जिल्हा अध्यक्ष, शहर अध्यक्ष, जिल्हा कार्याध्यक्ष, शहर कार्याध्यक्ष यांच्या उपस्थित संग्रामसिंह पाटील यांची सोलापूर जिल्हा पक्षनिरीक्षकपदी निवड झाल्याबद्दल यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. याप्रसंगी सर्व जिल्हा पक्षनिरीक्षक यांच्या निवडी संपन्न झाल्या.
.......... चौकट ......
... पक्ष बळकटीसाठी निश्चित
प्रयत्न करणार : संग्रामसिंह पाटील
संग्रामसिंह पाटील यांनी माहिती देताना म्हटले की, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, युवक अध्यक्ष सुरज चव्हाण, तसेच इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तात्रय भरणे, पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर जिल्हा पक्ष निरीक्षक पदाची जबाबदारी पार पाडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बळकट करण्यासाठी निश्चित प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
------------------