Type Here to Get Search Results !

उपमुख्यमंत्री अजित पवार जिल्हा दौऱ्यावर

सोलापूर  : उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार हे शनिवार दिनांक 03 फेब्रुवारी रोजी सोलापूर जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.

शनिवारी, 03 फेब्रुवारी रोजी सकाळी 9.30 वाजता रे- नगर, कुंभारी, ता. दक्षिण सोलापूर येथे आगमन.  9.45 वा. ग्रामदैवत सिध्दरामेश्वर मंदिर-दर्शन.  सकाळी 10.30 वा. जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर येथे आगमन व जिल्ह्यातील विविध विकासकामे तथा योजनांची जिल्हास्तरीय आढावा बैठकीस उपस्थिती.  नंतर पत्रकार परिषद. दुपारी 12.45 वा. रामवाडी सोलापूर येथे आगमन व महिला सर्वरोग निदान आरोग्य शिबीर व विविध विकास कामांचा शुभारंभ कार्यक्रमास उपस्थिती.  दुपारी 1.30 ते 2.15 राखीव. 

2.30 वा. एम्पलायमेंट चौक, सोलापूर येथील  जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालय उद्घाटन समारंभ उपस्थिती.  3.00 वा. जुनी मिल कंपाऊंड चौक, सोलापूर येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालय उद्घाटन व कार्यकर्ता मेळाव्यास उपस्थिती.  4.30 वा. जामगुंडे मंगल कार्यालय, आसरा चौक येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता मेळाव्यास उपस्थिती. 

सायंकाळी 6.00 वा. हॉटेल बालाजी सरोवर येथे अल्पसंख्यांक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने ट्रस्टी संवाद कॉन्फरन्स उपस्थिती.  सायंकाळी 7.00 वा. शासकीय विश्रामगृह येथे आगमन व कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांसाठी राखीव.  8.10 वा.मिलींद नगर, बुधवारपेठ येथे राखीव.  8.45 वा. तिर्रे, ता. उत्तर सोलापूर येथे आगमन व राखीव. नंतर मोटारीने प्रयाण.