सोलापूर : छत्रपती महोत्सवानिमित्त मराठा सेवा संघ व RMEA यांच्या संयुक्त विद्यमाने 'भारतीय अर्थव्यवस्था व अर्थसंकल्प - २०२४ ' या विषयावर बुधवारी, २१ फेब्रुवारी रोजी अर्थतज्ज्ञ डॉ. संतोष कदम यांचं व्याख्यान आयोजित करण्यात आलं आहे.
विजापूर रस्त्यावरील मयूर हॉलमध्ये सायंकाळी ०६ वा. हे व्याख्यान होत असून मराठा सेवा संघ ,संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड सर्व कक्षाचे पदाधिकारी आणि सदस्यांनी वेळेवर उपस्थित राहावं, असं आवाहन अध्यक्ष RMEA सोलापूर, मराठा सेवा संघ जिल्हाध्यक्ष शिवश्री डॉ. जी. के. देशमुख, उपाध्यक्ष शिवश्री बब्रुवाहन माने-देशमुख, शिवश्री सदाशिव पवार, जिल्हा सचिव प्रा. लक्ष्मण महाडिक आणि महानगर अध्यक्ष शिवश्री सुर्यकांत पाटील यांनी केलं आहे.