सोलापूर : उत्तर सोलापूर तालुक्यातील होनसळ येथील दिलीपराव माने विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता दहावी व बारावी विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ कार्यक्रम पार पडला. या सर्व विद्यार्थ्यांना अजय पोण्णम यांनी,'दहावी बारावीनंतर पुढे काय व विद्यार्थ्यांपुढील आव्हाने' या विषयी मार्गदर्शन करताना, सर्व विद्यार्थ्यांना भावी वाटचालीची शिदोरी दिली.
या प्रसंगी प्रमुख पाहुणे अजय पोण्णम (अध्यक्ष, अरिहंत इंग्लिश मीडियम, सोलापूर) कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेच्या संचालिका माजी सभापती रजनी भडकुंबे होत्या. संस्थेचे अध्यक्ष संभाजी भडकुंबे, विनोद उपलंची (मुख्याध्यापक, राजेश कोठे इंग्लिश मीडियम) संस्थेचे संचालक पाटलोजी जानराव यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचं प्रास्ताविक शुभांगी पेठकर यांनी तर सूत्रसंचालन राशी सीताफळे यांनी केलं. शिक्षकांमधून उमेश जगताप, जरीना सय्यद विद्यार्थ्यांमधून वैभवी भोसले, आलिया पटेल, वैष्णवी भालेकर, प्रिया गायकवाड, आशिया पटेल, अर्पिता वानकर, अक्षरा कांगरे, अयान शेख, सुमित जाधव या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केली. तात्यासाहेब तांबे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.
याप्रसंगी मुख्याध्यापक राजेंद्र मोहोळकर, धर्मदेव शिंदे, सचिन नाईकनवरे, अख्तर सय्यद, अशपाक आतार, सुप्रिया पवार, शशी गायकवाड, विकी माने यांच्यासह इयत्ता दहावी-बारावी सर्व विद्यार्थी उपस्थित होते.