सोलापूर : मोटार सायकलवर चाललेल्या तरूणास रस्त्यात अडवून त्यास चाकूचा धाक दाखवून त्याच्या जवळील रोकड व बँक खात्यातून जबरदस्तीने ८० हजार रुपये काढून घेतलीय. ही घटना विजापूर रिंग रोडवर हॉटेल जय मल्हार जवळ घडली. याप्रकरणी फौजदार चवळी पोलीस ठाण्यात जोडगोळीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की उत्तर सोलापूर तालुका, पाकणी उजनी कॉलनीतील रहिवासी आशिष संजय माने (वय-२८ वर्षे) विजापूर बायपास रिंग रोडने जात असताना दुचाकीवर आलेल्या दोघा तरुणांनी, त्यास दुचाकी थांबविण्यास भाग पाडून त्याच्या पोटाला चाकू लावला. त्यास मारहाण करून दुचाकीवर बसून जय मल्हार हॉटेलजवळ नेले. त्या ठिकाणी त्याच्या दोन बँक खात्यातून एटीएम व फोन पे द्वारे ऑनलाईन ट्रांजेक्शन करून ८० हजार रुपये जबरदस्तीने काढले.
त्यावेळी आशिषचे आधारकार्ड, पॅनकार्ड असणारे पाकिट जबरदस्तीने खिशातून काढून घेतले. हा प्रकार ३० जानेवारीच्या दुपारी घडलाय. या प्रकरणी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात सोमवारी रात्री उशिराने दाखल झालेल्या फिर्यादीनुसार दोन अनोळखी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सहाय्यक पोलीस निरीक्षक बनसवडे या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.