सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोलापूर कार्यकारिणी नुकतीच जाहीर केली असून विविध सेल च्या नूतन पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्रं प्रदान करण्यात आली. यामध्ये सोलापूर VJNT सेलच्या सोलापूर शहर अध्यक्षपदी रुपेशकुमार भोसले यांची फेरनिवङ करण्यात आली आहे. ही निवड पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या आदेशानुसार प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
गेल्या अनेक वर्षापासून रुपेशकुमार भोसले VJNT सेलच्या अध्यक्ष पदाची जबाबदारी अति उत्तम पध्दतीने हाताळली. पक्षाच्या आदेशाप्रमाणे पक्षाचे काम प्रामाणिकपणे पार पाडली. सभासद नोंदणी आभियानमध्ये सोलापूर शहर जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकाचे पारितोषीक मिळवललं आहे.
पक्षाकडून दोन वेळा रुपेशकुमार भोसले यांच्या कार्याची दखल घेऊ त्यांचा सत्कार व सन्मान देखील करण्यात आला, याच कार्याची दखल घेऊन त्यांची पक्षाने VJNT सेलची जबाबदारी पुन्हा त्यांच्याच खांद्यावर सोपवली आहे. या त्यांच्या पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी शुभेच्छा दिल्या. या निवड प्रक्रियेबाबत सोलापूर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर-जिल्हाध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
यावेळी ज्येष्ठ नेते हेमंत चौधरी, जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले, सोशल मिडीया अध्यक्ष वैभव गंगणे, सोशल मीडिया कार्याध्यक्ष सोमनाथ शिंदे, ओबीसी शहर अध्यक्ष अनिल छत्रबंद, वैद्यकीय शहर अध्यक्ष बसवराज कोळी, सामाजिक न्याय विभाग राजू बेळेनवरु, ओबीसी कार्याध्यक्ष इरफान शेख, सामाजिक न्याय कार्यअध्यक्ष अनिल बनसोडे, नागेश निबाळकर, अमिर शेख, संस्कृतिक विभाग शहर अध्यक्ष आशुतोष नाटकर व मित्र परिवार यांची उपस्थिती होती.