पंढरपूर : रेल्वे प्रशासनातील निवृत्त वरिष्ठ वाणिज्य निरीक्षक (SCI) गजानन दिगंबर लव्हेकर यांचे उपचारादरम्यान निधन झाले. ते मृत्यूसमयी ८५ वर्षाचे होते. सोलापूर येथे त्यांच्यावर खासगी दवाखान्यात मागील पाच दिवसापासून उपचार सुरु होते, मात्र मंगळवारी, ०९ जानेवारी रोजी दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली.
त्यांच्या पश्चात ३ मुले, १ मुलगी आणि नातवंडे असा परिवार आहे. कै. गजानन लव्हेकर यांच्यावर पंढरपूर येथील वैकुंठ स्मशानभूमीत रात्री ०९ वा.अंत्यसंस्कार आले. पंढरपूर TV9 मराठी चॅनेलचे प्रतिनिधी रवी लव्हेकर यांचे ते वडिल होतं.