सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल रुग्णांच्या नातेवाईकांना दररोज मोफत अन्नदान

shivrajya patra



सोलापूर : "अन्न हे पुर्ण ब्रम्ह"प्राचीन काळापासून अन्नदानाला अन्यय साधारण महत्त्व आहे.तहानलेल्या पाणी ,भुकेलेल्यांना अन्नदान ह्यापेक्षा पुण्याचे काम नाही.जोपर्यंत पोटात अन्नाचा कण जात नाही, तोपर्यंत दुसरे काहीच सुचत नाही.अर्थातच भरल्या पोटी माणूस काहीतरी दिव्य करु शकतो. त्याचाच भाग म्हणून आस्था रोटी बँकेने आपली कार्यकक्षा रुंदावत सिव्हिल हॉस्पिटलमधील दाखल रुग्णांच्या सोबत असणाऱ्या आप्तेष्ठांसाठी दररोज अन्नदान उपक्रम सुरू केला असल्याची माहिती आस्था रोटी बँकेचे विजय छंचुरे यांनी दिलीय.

आज ही कित्येक ज्येष्ठांना एक वेळेच अन्न मिळत नाही, त्यांना पोटभर जेवण मिळत नाही, कारणं खूप असू शकतात, अशा ज्येष्ठांच्या पोटच्या मुलांनी त्यांच्या केलेला त्याग किंवा बरेच युवा पिढी पोटाची खळगी भरायला म्हणून परगावी परराज्यात किंवा परदेशात गेलेत व तिथलेच होऊन गेले. आजची तरुण पिढी जगण्याच्या संघर्षात आई-वडिलांकडे लक्ष देऊ शकत नाहीत, किंवा परिस्थितीच्या रेट्यापुढे तेही हतबल असातील. अशा एक ना अनेक कारणांमुळे आजही ज्येष्ठ नागरिकांच्या अन्नासाठीचा संघर्ष डोळ्यात पाणी आणणारा आहे. ज्येष्ठांना आजही आर्थिक, मानसिक व शारिरीक कष्टाला पर्याय नाही, अशा परिस्थितीतील ज्येष्ठांना दोन वेळेच सकस ,ताजे आस्थाने आपुलकीने चौकशी करण्याचे काम आस्था रोटी बँक करते.

आपल्या घरामध्ये लग्न समारंभ किंवा वाढदिवसानिमित्त इतर कुठलेही कार्यक्रमामधील अन्न शिल्लक राहिल्यास आस्था फाउंडेशन संचलित आस्था रोटी बँकेला कळवा, असेही छंचुरे यांनी म्हटलंय.

आजचे आहार दान 

१) नागनाथ रामचंद्र धाराशिवकर

२) नाव न सांगण्याच्या अटीवर एका व्यक्तीने

आपणही अशा लोकांकरिता अन्नदान करताना मदत करू शकता.

आस्था रोटी बँक, सोलापूर

नंबरशी संपर्क साधावा 

नीलिमा हिरेमठ - 8788254025

  छाया गंगणे -   8626002612

  स्नेहा मेहता  - 9423535819

  स्नेहा वनकुद्रे - 8482953686

  साधना संगवे - 9404547918

  पुष्कर पुकाळे -7798033407

  मंगल पांढरे - 8830413549

गोरगरिबांची सेवा हीच ईश्वर सेवा; अन्नदान सर्वश्रेष्ठ दान

आस्था फाउंडेशन, सोलापूर A/C120025949904

IFSC code CNRB000013 

Phonepe number -9096452778

To Top