Type Here to Get Search Results !

... तर जिल्ह्यातील मराठे स्थानिक आमदारांना घेराव घालणार : दास शेळके


... अन्यथा खंडोबाच्या आसूडाने त्यांची जी हसडू :सुनिल रसाळे

सोलापूर : मराठा योद्धा मनोज जरांगे पाटिल यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवली सराटी ते मुंबई पायी यात्रा सुरू केली आहे. २६ जानेवारी रोजी ही यात्रा आझाद मैदान येथे धडकणार आहे. मराठा योद्धा मनोज जरांगे पाटिल यांच्या मागण्या मान्य व्हाव्यात, त्यांना उत्तम आरोग्य मिळावे, यासाठी बाळे येथील खंडोबा मंदिरात महाआरती करण्यात आली. मराठा आंदोलनादरम्यान सरकारने दखल घेतली नाही तर जिल्ह्यातील मराठे स्थानिक आमदारांना घेराव घालणार असा इशारा मराठा क्रांती मोर्चा समन्वयक दास शेळके यांनी यावेळी दिला. 



महाआरतीच्यावेळी मराठा क्रांती मोर्चा महिला आघाडीच्या कार्याध्यक्षपदी माजी नगरसेविका लता फुटाणे यांची निवड करत त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले. मराठा आमदारांनी जरांगे पाटील यांच्याविषयी अपशब्द वापरू नये, अन्यथा खंडोबाच्या आसूडाने त्यांची जी हसडू, असा इशारा मराठा क्रांती मोर्चा समन्वयक सुनिल रसाळे यांनी यावेळी बोलताना दिला.



यावेळी आबा सावंत, सुनिल सुरवसे, सुनिल हुंबे, विश्वास चव्हाण, धर्मराज भोसले, बाबा शेख, गणेश सरोळे, संतोष जाधव, शेखर फंड, निलेश शिंदे, अमित माने, कृष्णा थोरात, अक्षय शिंदे, ओंकार निंबाळकर, सचिन गोडसे, संजय घाडगे, दिनेश माने, राजाराम पवार, संभाजी शितोळे, निरंजन नवघिरे यांच्यासह युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.