Type Here to Get Search Results !

राष्ट्र उभारणीत मतदाराराष्ट्र उभारणीत मतदारांची भुमिका महत्वाची : कुमार आशीर्वाद

            

सोलापूर : भारत हा देश लोकशाहीप्रणालीचा आदर करणारा देश म्हणून संपूर्ण जगात ओळखला जातो. लोकशाही प्रणालीमध्ये प्रत्येक नागरीकाला आपले अधिकार आहेत. आपल्या लोकशाहीप्रणालीमध्ये मतदानास अनन्यसाधारण महत्त्व आहे. निवडणुकीच्या माध्यमातून आपला व आपल्या परिसराचा विकास साधण्यासाठी उमेदवाराला आपण मतदानाच्या प्रक्रियेतून निवडून देतो. आपण कुठलीही जात-धर्म समोर न ठेवता राष्ट्र उभारणीसाठी मतदारांनी मतदान करावे व आपल्या घरातील-आजुबाजूला मतदान करण्यास प्रवृत्त करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले.


भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार दिनांक २५ जानेवारी राज्यासह देशभरामध्ये राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यात येतो. या अनुषंगाने जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर यांच्यावतीने राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यात आला. 



यावेळी कार्यक्रमास जिल्हा पोलीस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे,  महसूल उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निऱ्हाळी, प्रांताधिकारी सदाशिव पडदुणे, विठ्ठल उदमले तसेच महसूलचे अधिकारी व कर्मचारी  उपस्थित होते.



यावेळी जिल्हाधिकारी आशीर्वाद म्हणा,ले, मतदान हा एक आपला मुलभूत हक्क आहे. देशाच्या लोकशाही परंपरेचे जतन करुन मुक्त, निपक्षपाती व शांततापूर्ण वातावरणात निवडणुकीसाठी मतदान करावे, तसेच नागरीकांनी आपल्या शेजारील  लोकांना देखील मतदानासाठी जागृत करावे. जिल्ह्यात विशेष मोहिमेतर्गंत मतदार यातील शुध्दीकरण करून १ लाख ५६ हजार ६७२ मयत झालेली नावे किंवा जिल्ह्याबाहेर विस्थापित झालेली कुटुंबांची नावे वगळून नवीन यादी तसेच युवा मतदान नाव  नोंदणी करण्यासाठी विशेष भर देण्यात आला. जिल्ह्यातील सर्व प्रांताधिकारी,तहसिलदार, नायब तहसिलदार, मंडलाधिकारी, तलाठी व इतर महसूल कर्मचाऱ्यांनी विशेष मोहिम राबवून जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयात मतदान जागृती करून वय १८ वर्षे पूर्ण असलेल्या युवक-युवती चे नवीन नाव नोंदणी करून मतदाराचा टक्का वाढवलेला आहे. मोहिमेअंतर्गत पारधी समाज व इतर भटके समातील लोकांचा  मतदार यांदीत समावेश करण्यावरही भर दिला असल्याचे जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सांगितले आहे.



यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निऱ्हाळी यांनी जिल्ह्यातील मतदारांची एकुण आकडेवारी, वगळण्यात आलेली नावे व नवीन नाव नोंदणी  करण्यात आलेली आकडेवारीबाबत माहिती प्रास्ताविकात दिली. प्रारंभी कार्यक्रमाची सुरवात जिल्हाधिकारी आशीर्वाद यांच्या हस्ते दिपप्रज्वलनाने  करण्यात आली. कार्यक्रमाच्या अखेरीस  प्रांताधिकारी सदाशिव पडदुणे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.