सोलापूर : प्रजासत्ताक दिनाच्या ७४ व्या वर्धापन दिनानिमित्त पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते शुक्रवारी, २६ जानेवारी रोजी सकाळी ०९.१५ वाजता पोलीस परेड ग्राऊंड, पोलीस आयुक्त मुख्यालय, सोलापूर येथे मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ संपन्न होणार आहे.
तरी या मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभास सर्वांनी राष्ट्रीय पोषाखात उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.