मंगळवेढा : मंगळवेढा येथील संगीत रजनी सांस्कृतिक कार्यक्रमात गुरुवारी, १८ जानेवारी रोजी ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर, कविता पौडवाल, मोहंम्मद अयाज यांचा स्वर जल्लोष पार पडला. या वेळी धनश्री मल्टीस्टेट परिवार तर्फे सन्मान करण्यात आला.
या वेळी प्रा. शिवाजीराव काळुगें, शोभा काळुंगे, कल्याणराव काळे, अभिजित पाटील (आबा) धनक्षी च्या राजलक्ष्मी, दिगंबर भगरे सह अनेक मान्यवर उपस्थित होते, दामाजी प्रांगणात हजारों रसिकांनी या सांस्कृतिक कार्यक्रमाचा आनंद घेतला.
या कार्यक्रमात पार्श्वगायिका उषा मंगेशकर यांनी अविट गाणी सादर करुन उपस्थितांची मने जिंकली तसेच कविता पौडवाल व मोहम्मद अयाज अनुष्का यांनी उडत्या चालीची गाणी सादर करुन रसिकांना मंत्रमुग्ध केले.