साहित्यिक शेख शफी बोल्डेकर स्व.काशीबाई घुले राज्यस्तरीय पुरस्काराचे मानकरी

shivrajya patra

मंगळवेढा : सप्तर्षी प्रकाशन मंगळवेढा (जिल्हा सोलापूर) च्या वतीने देण्यात येणारा प्रतिष्ठेचा स्व.काशीबाई घुले राज्यस्तरीय पुरस्कार पोस्टाने प्राप्त होताच गावकऱ्यांच्या वतीने बोल्डागांव येथील सरपंच किशनराव विणकर यांच्या शुभहस्ते बोल्डागांव येथील प्रसिद्ध साहित्यिक शेख शफी बोल्डेकर यांना प्रदान करण्यात आला. 

या पुरस्कार सोहळ्याला बोल्डागांवचे पोस्टमन मोहनराव जोशी,  पोलिस पाटील प्रतापराव ढोकणे, शिक्षक गोविंदराव ढोकणे,  माजी सरपंच संतोष ढोकणे, प्रल्हाद ढोकणे, ग्रामपंचायत सदस्य झिंगाजी ढोकणे , अविनाश ढोकणे,संतोष माऊली, प्रकाश ढोकणे आदि मान्यवर उपस्थित होते.

यावेळी पुरस्कारार्थी म्हणून कवी शफी बोल्डेकर यांनी मनोगत व्यक्त केले. मनोगतातून त्यांनी सदरील पुरस्कार हा सूफी संत मिस्कीन शाहवली बाबा यांना अर्पण केल्याचे जाहीर केले.

To Top