Type Here to Get Search Results !

श्री जिव्हेश्वर विद्यार्थी विकास मंच, च्या वतीने ५१ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वितरण


सोलापूर : श्री जिव्हेश्वर विद्यार्थी विकास मंच, सोलापूर आयोजित शैक्षणिक शिष्यवृत्ती, सायकल वितरण, स्पर्धा पारितोषिक वितरण कार्यक्रम रविवारी, ०७ जानेवारी रोजी सकाळी ११ वा. श्रीकृष्ण मंगल कार्यालय येथे संपन्न झाला. कार्यक्रमाचे उद्घाटन सौ. मंगला अष्टेकर व हरीश अष्टेकर दाम्पत्य यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्व. साळी विद्यार्थी सहाय्यक मंडळ, मुंबई चे अध्यक्ष जितेंद्र साळी होते. 

या कार्यक्रमात स्वकुळ साळी विद्यार्थी सहाय्यक  मंडळ, मुंबई यांच्या वतीने सोलापुरातील ५१ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वितरण तसेच जिव्हेश्वर विद्यार्थी मंचकडून सायकल बँक योजनेतून सोलापुरातील गरीब गरजू २५ विद्यार्थांना सायकलींचे वितरण प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी लक्ष्मण सरवदे मुंबई, धाराशिव चे सराफी व्यावसायिक संजय गणेश,  दानशूर ज्येष्ठ समाजबांधव सौ. शांताबाई-निवृत्ती गायकवाड, मंचचे अध्यक्ष कृष्णा सुरे व्यासपीठावर उपस्थित होते. 

दिवाळी मध्ये घेण्यात आलेल्या किल्ला आणि घरकुल स्पर्धेचे रोख पारितोषिक वितरण तसेच सहभागी विद्यार्थ्यांना अभिनंदन पत्र तसेच पुस्तक भेट स्वरूपात भेट देण्यात आले. विद्यार्थी मंचचे माजी विद्यार्थी डॉ. प्रवीण सरवदे यांनी नुकतेच ओम क्लिनिक या नांवे हॉस्पिलचा शुभारंभ केल्याबद्दल मंचच्या वतीने डॉ. प्रवीण सरवदे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.

या उपक्रमास अंबर सरवदे, उमेश गायकवाड, निशांत पोरे, गिरीष गुळेद, संतोष उकरंडे, जगन्नाथ ढगे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन कु. नेहा एकबोटे, कु. यशश्री माळवदकर, वैष्णवी भंडारे यांनी केले. पाहुण्याचा परिचय प्रा.डॉ. चंद्रशेखर टोणपे तर सौ. अनुराधा काजळे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले. 

मंचच्या सदस्या गिरीकन्या सौ. अनुराधा काजळे यांचा थायलंड येथे महिला दिनानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमात गौरव करण्यात येणार त्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार सौ. मंगला अष्टेकर यांच्या हस्ते करण्यात आला.