Type Here to Get Search Results !

आमदार राजा राऊत यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालयास सदिच्छा भेट

 



सोलापूर : बार्शीचे आमदार राजा राऊत सोमवारी सोलापूरच्या धावत्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यात आमदार राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर-जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांच्या पार्क चौक येथील कार्यालयास सदिच्छा भेट दिली. यावेळी आ.राऊत व पवार यांच्यात सोलापूर शहर-जिल्ह्यातील विविध प्रश्नांवर चर्चा झाली.

  • यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर-जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांनी त्यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मिङीया शहराध्यक्ष वैभव गंगणे, सकल मराठा समाज समन्वयक माऊली पवार, अंकुश आवताङे, बालाजी सगलूर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी सोलापूर शहर आणि जिल्ह्याच्या विकासासाठी शासन स्तरांवरुन सर्वाधिक निधी आणून कामे मार्गी लावण्याचे आश्वासन आ. राऊत यांनी यावेळी दिले.