Type Here to Get Search Results !

साहित्य समाजाचा आरसा असतो : संमेलनाध्यक्ष डॉ. अर्जिनबी युसूफ शेख


राज्यस्तरीय दुसरे फातिमाबी शेख मराठी साहित्य संमेलन मोठ्या थाटात संपन्न

सोलापूर : साहित्य हे समाजाचा आरसा असतो, समाजात जे काही घडतं, ते साहित्यात प्रतिबिंबिंत होते. साहित्यात ज्या घडत नाही अर्थातच सत्य मांडण्यात येत नाही. ते साहित्य समाजाला वाचवू शकत नाही, समाजाला आरसा दाखवू शकत नाही. समाजात सकारात्मक बदल घडवू शकत नाही, असं साहित्य इतिहास घडवू शकत नाही, असं प्रतिपादन संमेलनाध्यक्ष डॉ. अर्जिनबी शेख (अकोला) यांनी केले.


अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य परिषद, सोलापूर व ग्रामीण मुस्लिम मराठी साहित्य संस्था बोल्डा  यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी, ७ जानेवारी रोजी राज्यस्तरीय दुसरे फातिमाबी शेख मुस्लिम मराठी साहित्य साहित्य संमेलन सोशल महाविद्यालयात मोठ्या थाटाने संपन्न झाले. 

सचिव अय्यूब नल्लामंदू यांनी कुरान पठण करून संमेलनाची सुरुवात केली. यानंतर डॉ. अजीज नदाफ यांच्या हस्ते वृक्षाला जल अर्पण करून उद्घान करण्यात आले. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी सुप्रसिध्द साहित्यिक, लेखिका प्रा. डॉ. अर्ज़िनबी युसुफ शेख होत्या.


यावेळी मंचावर स्वागताध्यक्षा सौ. सुरैय्या जहागीरदार,  डॉ. अजीज नदाफ, मुख्य संयोजक प्राचार्य इ. जा. तांबोळी, अय्यूब नल्लामंदू, प्राचार्य शकील शेख, अनिसा शेख, अॅड. हाषम पटेल, मुस्लीम कबीर, कवी मुबारक शेख, सय्यद अलाऊद्दीन (आष्टी), सायराबानू चौगुले (रत्नागीरी), खजीनदार हसीब नदाफ इ. उपस्थित होते. या सर्व मान्यवरांच्या हस्ते इंतेखाब फराश संपादित "स्पंदन" आणि इ. जा. तांबोळी व अय्यूब नल्लामंदू संपादित काव्य संग्रह "गुलदस्ता ", खाजाभाई बागबान लिखित "पाऊलखुणा"  सायराबानू चौगुले लिखित "वैचारिक कवडसे" या काव्य संग्रहाचे  प्रकाशन झाले.


यानंतर बेन्नूर फौडेशनच्यावतीने मुबारक शेख यांना फखरोदीन बेन्नूर स्मृती पुरस्कार, तर फराश फौंडेशन तर्फे प्राचार्य तांबोळी यांना समाजरत्न पुरस्कार आणि शाहिदा सरयद यांना युगस्त्री फातीमाबी शेख साहित्य पुरस्कार-२४ सन्मानपूर्वक देण्यात आले.

शफी बोल्डेकर यांनी प्रास्ताविक केले, स्वागताध्यक्क्षा डाँ.सौ. सुरैय्या जहागीरदार यांनी सर्वांचे स्वागत करत शाल बुके देऊन सत्कार केला व आपल्या स्वागत अध्यक्ष मनोगताचा सारांश सादर केला. दोन्ही संस्थेच्यावतीने प्रास्ताविक डॉ. तांबोळी व शफी बोल्डेकर यांनी केले.

भारतातील मुख्य समस्या गरीबी आणि आर्थिक बळकटी करिता योग्य मार्गदर्शनाचा अभाव असल्या कारणाने याकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे, असं सांगून डॉ. अर्जिनबी शेख पुढे म्हणाल्या, पती आर्थिक स्वरूपात सक्षम नसल्या कारणाने उद्भवणारी आर्थिक तंगी व महिलांची होणारी तारेवरची कसरत चिंतेची बाब आहे. महिलांच्या हाताला काम मिळाले कि आर्थिक तंगी दूर होण्यास मदत मिळते.

मुस्लीम महिलांना पुरुषाकडून पदोपदी मिळालेल्या सहकार्य मुस्लीम महिलांच्या जीवनात साफल्यपूर्ण आनंदी बहर आणू शकते. मुस्लीम समाजाच्या उत्कर्षात अखंड भर घालू शकते, असेही त्यांनी यावेळी म्हटले.


संमेलनाचं सूत्रसंचालन डॉ. महंमद शेख यांनी केले तर अय्यूब नल्लामंदू यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.

दुपारच्या परिसंवाद प्राचार्य शकील शेख यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. या सत्रात नसीम जमादार (कोल्हापूर) हसीब नदाफ, अय्युब नल्लामंदू (सोलापूर), तहसीन सय्यद (पुणे), निलोफर फणीबंद, रजिया जमादार (अक्कलकोट) हे सहभागी होऊन . " स्त्री मुस्लिम मराठी साहित्यिकांची दिशा " या विषयवर आपले विचार मांडले. या सत्राचं सुत्रसंचालन प्रा. सौ. रईसा मिर्जा यानी केलं.



रंगतदार झाला कवी संमेलन 

मुबारक शेख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कवी संमेलनात, साबीर सोलापूरी, साईनाथ राहटकर (नांदेड), मोहिदीन नदाफ, शेख जाफर अ. हमीद शेख, जमील अन्सारी (नागपूर), ' शैंलेंद्र पाटील, कल्याण राऊत, शाहीदा सयद, अॅड. इकबाल , अनिता वलांडे , सय्यद तहसीन  (सर्व लातूर ) . रामचंद्र गुरव , अॅड रामचंद्र पाचुणकर (पुणे), सारिका देशमुख (उस्मानाबाद) मोहिदीन नदाफ (बार्शी), राणी धनवे (मंगळवेढा), सिकंदर मुजावर (मोहोळ), इम्तियाज तांबोळी (फलटण), जाकीर तांबोळी, सफुरा तांबोळी (वैराग ) एम. ए. रहीम (चंद्रपुर), राहुल राजारामपुरे (इचलकरंजी), सुमीत हजारे (ठाणे), गौस पाक शेख (पालघर, ठाणे ) प्रकाश  सनपुरकर, डॉ. रेशमा पाटील, आनंद घोडके (सोलापूर), गौसपाक मुलाणी, सुवर्णा तेली (सांगोला) शेख चिकतीकर (नांदेड), निलोफर फणीबंद, सौ. रजिया जमादार (अक्कलकोट), सौ. महमूदा शेख (देहू), भुपेंद्र आल्हाट (तळेगांव दाभोडे) या कवींनी आपल्या रचना सादर करून वाहवा मिळविली. याचं सूत्रसंचालन अॅड. उमाकांत आदमाने (पुणे) व सौ. नसीमा जमादार यांनी केले.

ॲड. हाषम पटेल (लातूर) यांच्या अध्यक्षतेखाली समारोप झाला. यात मुस्लीम कबीर लातूर, कवी शफी बोल्डेकर यांनी आपले विचार व्यक्त केले. सूत्रसंचालन खाजाभाई बागवान यांनी केले तर इंतेखाब फराश यांनी उपस्थितांचे आभार मानले.

एक दिवसीय फातीमांबी साहित्य संमेलन यशस्वी करण्यासाठी  मजहर अल्लोळी, अनिसा सिकंदर शेख, डाॅ. महंमद शेख, इक्बाल बागबान, अबुबकर नल्लामंदू, फारूक कोतकुंडे यांनी अथक परिश्रम घेतले.

यावेळी काझी मखदुम (बीड), डॉ. सिराज खान आरजु (औरंगाबाद/छत्रपती संभाजी नगर), पठाण ए. पठाण, अय्युब खान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शेख पाशाभाई, माजी नगरसेवक बबलू गायकवाड, शिवसेनेचे शरद कोळी, मोहसीन मैंदर्गीकर, इंजिनियर जहागीरदार, डॉ. शफी चोबदार, अब्दुल मन्नान शेख, अन्वर कमिशन, प्रा. बी. एच, करजगीकर, शगुफ्ता दंडोती, सय्यद इकबाल आणि अबरार नल्लामंदू आदी उपस्थित होते.