Type Here to Get Search Results !

ऑल इंडियन रिपोर्टर असोसिएशन च्या वतीने पत्रकार दिवस साजरा


सोलापूर : मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक, 'दर्पण' कार बाळशास्त्री जांभेकर यांचा जयंती दिवस पत्रकार दिनानिमित्त ऑल इंडियन रिपोर्टर असोसिएशन च्या वतीने पत्रकार दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात शहर-जिल्ह्याच्या पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनिय योगदान असलेल्या पत्रकारांचा असोसिएशनचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सलाऊद्दीन शेख यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.


येथील तेलंगी पाच्छा पेठेतील साने गुरुजी हॉलमध्ये रविवारी, ०७ जानेवारी रोजी दुपारी पत्रकार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात  पत्रकार  सन्मान करण्यात आला. यावेळी  प्रदेशाध्यक्ष सलाउद्दीन शेख यांनी, अनेक वर्षापासून पत्रकारांच्या हितासाठी असोसिएशन काम करीत आहे, असं सांगताना आजवरची वाटचाल अन् असोसिएशन विस्तारासंबंधी सविस्तर माहिती दिली. याप्रसंगी सोलापूर सोशल असोसिएशन कॉलेजचे प्राचार्य इ. जा. तांबोळी, काँग्रेस अल्पसंख्यांक सेलचे अध्यक्ष जुबेर कुरेशी, सोलापूर जिल्हा माहिती अधिकारी सुनिल सोनटक्के यांची प्रमुख उपस्थिती होती. 



जिल्हा माहिती अधिकारी सुनिल सोनटक्के यांनी, शासनाकडे पत्रकारांसाठी विविध योजना आहेत. पत्रकारांनी त्याचा लाभ घ्यावा, असं आवाहनही यावेळी बोलताना केले. या कार्यक्रमात, सोलापूर शहरामध्ये अनेक वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात कार्य करणारे पत्रकार जाकीर हुसेन हुंडेकरी, 'लोकप्रधान' चे संपादक अयाज शेख, 'लोक प्रहार' चे संपादक जमीर शेख यांचा जिल्हा माहिती अधिकारी सोनटक्के यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 

कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता ऑल इंडियन रिपोर्टर असोसिएशनचे सोलापूर शहराध्यक्ष विजयकुमार उघडे, उपाध्यक्ष मुस्ताक शेख, सचिव मुन्ना पठाण, फिरोज शेख यांनी परिश्रम घेतले. शेवटी इब्राहिम जमादार यांनी सर्व उपस्थितांचं आभार मानले.