सोलापूर : सागर सिमेंट चे राज्य व्यवस्थापक व MK फौऊंङेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगनुरे यांच्या विजापूर रोङ येथील पनाश अर्पाटमेंट या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर-जिल्हाध्यक्ष संतोष पवार व कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांनी सदिच्छा भेट दिली.
यावेळी महादेव कोगनुरे यांच्या सामाजिक उपक्रमांचे संतोष पवार व जुबेर बागवान यांनी विशेष कौतुक केले.सोलापूरच्या विविध प्रश्नांंवर ही यावेळी प्रामुख्याने चर्चा करण्यात आली. यावेळी MK फौऊंङेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगनुरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सोलापूर शहर-जिल्हाध्यक्ष संतोष पवार व कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
यावेळी प्रमोद भोसले, अमिर शेख, महादेव कोगनुरे यांचे स्वीय्य सहाय्यक तथा संपर्क प्रमुख अजित पाटील यांची उपस्थिती होती.