Type Here to Get Search Results !

सोलापूरच्या ३० महिलांसह ५० जणांनी केलं तोरणा गड सर करून नव वर्षाचे स्वागत


सोलापूर : सरत्या वर्षाला निरोप देताना आणि नव्या वर्षाचे स्वागत करताना निसर्गाशी एकरूप व्हावे, या हेतुने सोलापूर मधील ३० महिलांसह ५० जणांनी शिवरायांच्या स्वराज्यातील पहिला गड म्हणजेच तोरणा गड चढून नव्या वर्षाचे स्वागत केले. पत्रकार परशुराम कोकणे यांच्या इको फ्रेंडली क्लबकडून याचे आयोजन करण्यात आले होतं.


वयाचे भान नाही, प्रचंड उत्साह घेऊन सोलापूरमधील ३० महिला आणि २० पुरूष यांनी एकत्रीतपणे सन २०२३ च्या अखेरच्या दिवशी म्हणजेच, ३१ डिसेंबरच्या सकाळीच पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात असलेला, त्याकाळी विचित्र गड असा नामोल्लेख असलेला रोहिडा किल्ला अवघ्या काही तासातच सर केला. 

०८ वर्षाच्या बालकापासून ते ६५ वर्षाच्या आजीपर्यंत सर्वांनीच आपले वय, शरीर क्षमता विसरून रोहिडा किल्ला चढून आगळा-वेगळा उपक्रम पार पाडला. जय शिवाजी, जय भवानी, हर हर महादेव, अशा जयघोषातच ही मोहिम फत्ते करण्यात आली. 


त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे सन २०२४ चा पहिला दिवस ०१ जानेवारीच्या पहाटेच सर्व ५० जणांनी छत्रपती शिवाजी महाराज यांनी वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षातच हिंदवी स्वराज्यात आणलेला पहिला गड तोरणा किल्ला. पुणे जिल्ह्यातील सर्वांत उंच असलेला तोरणा किल्ला सोलापूरच्या या महिला-पुरूष मंडळींनी नव्या वर्षाच्या उगवत्या सुर्याच्या पहिल्या किरणाचे आगमन होताच किल्ला चढण्यास सुरूवात केली. प्रचंडगड असे नाव असलेल्या या तोरणा गडावर अवघ्या काही तासातच सर्वांनी एकमेकांच्या मदतीने तोरणागड चढून नव वर्षाचे स्वागत केले. 

काही वेळ विश्रांतीनंतर जेवण करून पुन्हा काही वेळातच हा तोरणा गड उतरण्यात आला. त्यानंतर रात्रीच्या सुमारास छत्रपती संभाजी महाराज यांच्या दूध आई धाराऊ यांचे वंशज रवि गाडे यांच्या राजवाडा या हॉटेल मध्ये त्यांची भेट घेऊन ऐतिहासिक घटनांना उजाळा देण्यात आला. त्यानंतर सोलापूरकडे परतीचा प्रवास सुरू झाला.

प्रवास सुखकर होण्यासाठी चडचणकर ट्रव्हल्सचे संचालक जगदीश चडचणकर आणि सोमनाथ चडचणकर यांच्या मार्गदर्शनाखाली चालक घोरपडे, त्यांचे सहकारी अतिश तांबे यांचे सहकार्य मिळाले. पुणे सदस्यांच्या प्रवासाकरिता अतुल दाभाडे यांचे सहकार्य लाभले.

इको फ्रेंडली क्लबचे संस्थापक, वसुंधरा मित्र परशुराम कोकणे, समन्वयक सटवाजी उर्फ अजित कोकणे, सदस्य संतोषकुमार तडवळ, ज्येष्ठ पत्रकार विनायक होटकर, माधव वडजे, पल्लवी सद्दलगी, देवाशिष शहा यांच्या नेतृत्वाखाली या उपक्रमात सोलापूर येथून संतोष घुगे, पद्मकांत घंटे, डॉ. गोविंद बाबुराव तावरे, शिल्पा राजेश माळी, साची माळी, रेवती रवींद्र घनाते, स्नेहल निलेश खमितकर, डॉ. प्रवीण बिरगे, नीता संतोष चिपडे, सहिषा चिपडे, सरस्वती कोकणे, परिचिता शहा, स्वरित अपूर्व शहा, सुहित धामणगावकर, प्राची धामणगावकर, डॉ.योजना संजय टोळे, वैष्णवी जयंत होले-पाटील, संजय साहेबराव टोळे, अंजली रवी कुंभार, कु. श्रद्धा आशिष पाटील, केतकी प्रशांत धामणकर, अक्षया शहा, किशोरी शहा, आराध्या कोकणे, गंगुबाई कोकणे, मोनिका तावनिया, अपूर्वा कुलकर्णी, डॉ. ऋतुजा निराळे, गीतांजली बेडगे, पूजा शेरखाने-कोकणे, समीर कलादगी, संगमनाथ नागोजी, नंदकिशोर साळुंखे, ईश्वर बुरा, आर्यन विनायक होटकर, कृष्णा प्रल्हाद काशीद, सोहम थिटे, यश पवार, प्रशांत तुकाराम जाधव तर पुणे येथून सुब्रमण्यम घंटे, मृणाल कुलकर्णी, अवनी भरले, युक्ता जोशी, अभिषेक रणदिवे, रुषिकेश काकडे, सातारा येथून सुनील मसूरकर यांनी सहभाग नोंदविला.


इको फ्रेंडली क्लबचा उपक्रम, रोहिडा किल्ला, नेकलेस पॉईंट, बनेश्वर मंदिर, एकमुखी दत्त मंदिरालाही भेट दिली.