सोलापूर : नोकरी इच्छुक उमेदवारांना रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टीने कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागीय आयुक्तालय, पुणे आणि लोकमंगल फाऊंडेशन, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे विभागातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांसाठी पंडीत दीनदयाळ उपाध्याय विभागीय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या रोजगार मेळाव्यास उमेदवारांचा भरघोस प्रतिसाद मिळाला.
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, विजापूर रोड, सोलापूर रोड येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या रोजगार मेळाव्यास आमदार सुभाष देशमुख, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता प्र.सहायक आयुक्त हनुमंत नलावडे, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी धुमाळ, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य जाधवर उपस्थित होते.
रोजगार मेळाव्याचे निमित्ताने संस्थेत तंत्र प्रदर्शन भरविण्यात आले. सदर प्रदर्शन कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार सुभाष देशमुख यांनी केले. यावेळी उपस्थितांनी संस्थेतील विविध व्यवसायातील प्रशिक्षणार्थी यांनी केलेले प्रोजेक्ट्सचे अवलोकन केले.या प्रसंगी आमदार देशमुख यांनी प्रत्यक्ष प्रशिक्षणार्थी मुले व मुली यांच्याशी संवाद साधला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेतील सर्व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.