जाधव परिवाराने साजरा केला आगळावेगळा हळदी-कुंकु कार्यक्रम

shivrajya patra

सोलापूर : मराठा सेवा संघाचा प्रभाव असलेल्या सौ. सुनिता संजय जाधव परिवार यांनी या वर्षी जो हळदी-कुंकवाचा कार्यक्रम घेतला, तो आगळावेगळाच ! सर्वप्रथम उपस्थित महिलांच्या हस्ते जिजाऊ मा साहेब यांच्या प्रतिमेचे पूजन करुन जिजाऊ वंदना घेतली. 

त्या नंतर सर्व महिलांनी मिळून विठ्ल -रुक्मिणी आरती घेतली.  सर्वांचं गुलाब पुष्प-पुस्तके भेटवस्तू देऊन स्वागत करुन तिळगुळ वाटप करण्यात आले.  सर्वांचे स्वागत सौ. सुनिता जाधव, सौ. विमल जाधव, सौ. स्वाती काळे,  कु. स्नेहल जाधव यांनी केले.

या कार्यक्रमासाठी सौ. कमल सावंत, रोहिणी सावंत, सौ. प्रतिभा काळे, सौ. राधा पवार,  तेजु पवार, सौ. अर्चना गिरी, शितल गिरी मंगल गिरी, जयश्री काळे, राजश्री काळे, पद्मिनी काळे, सुवर्णा काळे, ज्योती अरबळे, छाया साबळे, सिना यादव, रुक्मिनी काळे, इंदुबाई कचरे, लक्ष्मी मोहीते, सरिता सावंत, सई जाधव या सर्वांनी  हळदी-कुंकुसोबत सर्व महीलांनी आप-आपले  वाण कशासाठी वाटावे, यांची माहिती कु. साधना जाधव हिने सांगीतली.

जिजाऊंनी महिलांना सक्षम बनवून हे स्वराज्य उभे करणारे छत्रपती घडविले, असे मत सौ. काळे यांनी व्यक्त केले. आनंदी व उत्साही  वातारणात हळदी-कुंकु समारंभ संपन्न झाला. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन कु. साधना जाधव हिने केले तर कु. स्मिता जाधव हिने सर्व उपस्थितांचे आभार मानले.
To Top