Type Here to Get Search Results !

एस. ई. एस. तंत्रनिकेतन येथे माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा संपन्न


सोलापूर : एस ई एस तंत्रनिकेतन येथील २०१८, २०१९, २०२० या शैक्षणिक वर्षातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा संपन्न झाला. या मेळाव्यास तंत्रनिकेतन च्या विविध विभागातील ४०  माजी विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरवात कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे वालचंद अभियांत्रिकी कॉलेज चे मेकॅनीकल विभागाचे विभाग प्रमुख डॉ. भाग्येश देशमुख व संस्थेचे प्रमुख विश्वस्त अॅड. विजय मराठे, रणजीत देसाई यांच्या हस्ते सरस्वती पूजनाने व दीपप्रज्वलन करण्यात आली.

आपल्या मनोगतात देशमुख म्हणाले की, विद्यार्थ्यासाठी तत्परतेने आवश्यक ती मदत करू. गेस्ट लेक्चर, इंडस्ट्री संदर्भातील शैक्षणिक मदत करण्याची ग्वाही त्यांनी दिली. तंत्रनिकेतन मधून शिक्षण घेऊन विविध क्षेत्रात उच्च पदावर कार्यरत असणारे विद्यार्थी वर्गाचा अनुभव नक्कीच सध्या शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना होईल, असे त्यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले तर संस्थेचे सचिव विजय मराठे यांनी संस्था नेहमी विद्यार्थ्याच्या हितासाठी कार्यरत आहे. शिक्षणाची चांगली गुणवत्ता उपलब्ध करून देण्यासाठी संस्था कटीबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. प्राचार्य अतुल भावठानकर यांनी तंत्रनिकेतन च्या प्रगतीच्या आढावा सादर केला.



महाविद्यालयाचे शिक्षण पुर्ण करून विविध क्षेत्रात आपला वेगळा ठसा निर्माण केलेल्या विविध माजी विद्यार्थ्यांनी आपली मनोगते या वेळी व्यक्त केली. या मेळाव्यात माजी विद्यार्थ्यांनी  तंत्रनिकेतन च्या विद्यार्थी वर्गाला आवश्यक ती मदत करण्याची ग्वाही देण्यात आली.

या मध्ये संदीप क्षीरसागर या माजी विद्यार्थ्यांनी आजी विद्यार्थ्याच्या साठी भविष्यात आपण नवीन नवीन संकल्पना राबऊ व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमी प्रयत्नशील राहू, असे आश्वासन देण्यात आले. अजित पाटील, विशाखा भंडारे, देविका जैन, मुरली मादगुंडी, सदिच्छा उजळंबे, सादिक सौदागर, संजय पुजारी यांनी आपली मनोगते व्यक्त केली. 


यावेळी सोलापूर एज्युकेशन सोसायटीचे प्रमुख विश्वस्त  सचिव अॅड. विजय मराठे, रणजीत देसाई, तंत्रनिकेतन चे प्राचार्य अतुल भावठानकर, ए. एस. पाटील, एम. सी. पाटील, सौ. नागनसुरे, पी.आर., एन. ए. एखंडे, कुंभार पी. बी., व्हि. एन. कोंगारी, बायस व्हि. व्हि., प्राध्यापक वृंद, कर्मचारी, माजी विद्यार्थी मेळावा समन्वयक एस. एम. टिपे हे उपस्थित होते.

मेळावा यशस्वीतेसाठी क्षीरसागर बी. डी., सौ. समर्थ व्हि. एस., विभूते जी. एस., कन्नुरकर एस. जी., कुलकर्णी व्हि. ए.,सौ. मुरुमकर आर. आर., सुरवसे एन. एस., हुलसुरे जी. पी., येमूल एन. एन., घोणे एस. एम., सौ. एन. आर. वडावराव, चंदनशिवे ए. एस. यांनी परिश्रम घेतले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ. घोडके जी. के. यांनी केले तर आभार एस. एम. टिपे यांनी मानले.