पत्रकार महेश हणमे यांना मातृशोक

shivrajya patra

 

सोलापूर : येथील बाळे परिसर राजेश्वरी नगरातील रहिवासी उर्मिला सौदागर हणमे यांचं रविवारी मध्यरात्री अल्पशः आजाराने निधन झाले. त्यांच्यावर एका सहकारी रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्या मृत्यूसमयी ६९ वर्षांच्या होत्या.

मोहोळ तालुक्यातील हिंगणी गावात एका शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला होता. त्यांच्या पश्चात दोन विवाहित मुले - सुना, चार नातवंडे असा परिवार आहे. त्या आध्यात्मिक आणि मनमिळावू स्वभाव अशी त्यांची ख्याती होती. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. रविवारी सकाळी साडे अकरा वाजता बाळे येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पत्रकार महेश हणमे यांच्या त्या मातोश्री होत. 

To Top