सोलापूर : संविधानाच्या स्वतंत्रता, बंधुता, समानता, न्याय, बंधुता आणि लोकशाही इ. मुल्यांचा सामान्य भारतीय जनतेमध्ये प्रचार व प्रसार करण्यासाठी जमिअत उलमा-ए-हिंद सोलापूर च्या वतीने प्रजासत्ताक दिनी शुक्रवारी, २६ जानेवारी रोजी रात्री ०८ वा. विजापूर वेस येथील लक्ष्मी मार्केट येथे ' संविधान जागर परिषद ' चे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेत संविधान जागर मोहिमेतील सामाजिक संघटनांच्या प्रमुखांचा सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती जनरल सेक्रेटरी हसीब नदाफ यांनी दिली.
या परिषदेमध्ये सुप्रीम कोर्टाचे नामवंत वकील ॲड. तैवरखान पठाण, सोलापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. सुरेश गायकवाड यांचे विशेष मार्गदर्शन लाभणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष मौलाना हारीस ईशाअती हे भूषविणार आहेत. त्याचबरोबर बौद्ध भिक्खू भत्ते बी. सारीपुत्त, किरीटेश्वर मठाचे मठाधिपती स्वामीनाथ स्वामीजी, ख्रिश्चन धर्मगुरू रेव्ह. राजू आरेपागजी आदीं विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
राम गायकवाड सर, विजयकुमार हत्तूरे, बबलू गायकवाड, अशोक इंदापुरे, उत्तमभैया नवघरे, कॉ. रवींद्र मोकाशी, संजय जोगीपेठकर, सिद्धार्थ जाधवसर, ॲड.गोविंद पाटील, युवराज पवार, श्याम कदम, शेखर बंगाळे, पोपट भोसले, विष्णू गायकवाड, यशवंत फडतरे व अनिल जाधव आदी सामाजिक क्षेत्रात नामवंत कार्यकर्त्यांचा विशेष सन्मान या कार्यक्रमात करण्यात येणार असल्याचेही नजात यांनी सांगितले.
सदर कार्यक्रमास संविधान प्रेमी नागरिकांनी प्रचंड संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जमिअत उलमा-ए-हिंद चे जनरल सेक्रेटरी हसीब नदाफ, हाफिज अ.हमीद चांदा, युनूस डोणगांवकर, मंजूर मामा बागवान, मुश्ताक ईनामदार, हाफिज युसूफ, अशपाक बागवान, हाफिज महेमूद, मौलाना मैनुद्दीन, मौलाना तैय्यब, हाफिज सनाउल्ला अ.सत्तार दर्जी आदींनी केले आहे.