सोलापूर : सोलापूर इलेक्ट्रॉनिक्स डीलर्स असोसिएशन द्वारा इलेक्ट्रोनिक्स, कॉम्प्यूटर्स, टेलीकम्युनिकेशन, होम अप्लायन्सेस, सोलार व फिटनेस इक्विपमेंट्स वस्तूंचे भव्य प्रदर्शन ‘‘इलेक्ट्रो २०२४" प्रदर्शनाचे उद्घाटन बुधवारी, २४ जानेवारी रोजी सायं. ५.०० वा. वसंत जोशी, बिझनेस हेड, शार्प बिझनेस सीस्टमस् इंडीया ली. यांच्या शुभहस्ते व पोलीस उपायुक्त अजित बोऱ्हाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
दि. २४ ते ३० जानेवारी या कालावधीत एक्सिबिशन ग्राऊंड, मरीआई चौक, इंद्रधनु जवळ हे प्रदर्शन आयोजीत करण्यात आले आहे. यंदा इलेक्ट्रो प्रदर्शनाचे शार्प हे मुख्य प्रायोजक असून एमआयटी विश्वप्रयाग युनिव्हर्सिटी व सारेगम कारवाँ हे सह प्रायोजक आहेत. याप्रसंगी पाहुण्यांचे हस्ते प्रदर्शनाची माहिती देणाऱ्या क्यू आर कोड चा अनावरण करण्यात आले.
अध्यक्ष आनंद येमुल बोलताना म्हणाले की, इलेक्ट्रो २०२४ चे हे २४ वे वर्ष असून २३ वर्षापूर्वी २७ स्टॉल्सने सुरु झालेले हे प्रदर्शन आज जवळपास २८० स्टॉलचे प्रदर्शन झाले असल्याचे सांगीतले. आतापर्यंत इलेक्ट्रोने केलेल्या कामाची व ग्राहकांची दिलेल्या प्रतिसादाची ही पावतीच आहे असेही त्यांनी म्हटले. यावर्षी जवळपास दीड लाखपेक्षा जास्त ग्राहक प्रदर्शनास भेट देतील, असा अंदाज व्यक्त केला.
इलेक्ट्रो चेअरमन दिपक मुनोत यांनी प्रास्ताविक करताना सांगितले की यंदा प्रथमच ५ वेगळे डोम प्रकारच्या मंडपात हे प्रदर्शन उभारण्यात आले आहे. क्युआर कोडद्वारे सर्व सहभागी स्टॉलची माहिती ग्राहकांना आपल्या मोबाईलवर पाहण्याची संधी उपलब्ध करण्यात आली असल्याची माहिती दिली. काही स्टॉल्स् सामाजिक संघटनांना विनामूल्य देण्यात आलेली आहेत.या प्रदर्शनात खरेदी केलेल्या ग्राहकांसाठी दररोज लकी ड्रॉद्वारे आकर्षक बक्षिसे व शेवटच्या दिवशी ७ दिवसांत खरेदी केलेल्या ग्राहकांसाठी बंपर ड्रॉमध्ये आकर्षक बक्षिस असल्याची घोषणा करण्यात आली.
वसंत जोशी यांच्या शुभहस्ते द्वीप प्रज्वलन करण्यात आले. उद्घाटनपर बोलताना, जोशी यांनी अशा प्रकारचे एखाद्या व्यवसाईक संघटनेच्या अधिपत्याखाली होणारे हे प्रदर्शन संयोजकांचे प्रशंसा करावी तेवढी कमी आहे, असे गौरवोद्गार काढले. अजित बोऱ्हाडे यांनीही या उपक्रमाचे कौतुक करीत शुभेच्छा दिल्या. फीत कापून प्रदर्शन सर्वांसाठी खुले करण्यात आले.
सर्व स्टॉलमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना कंपनीकडून ट्रेनिंग देऊन ग्राहकांना माहिती देण्यात येते. रक्तदान प्रसार करण्याकरीता दररोज रक्तदान शिबीराचेही आयोजन करण्यात आले असल्याची माहिती सचिव भुषण भुतडा यांनी दिली.तसेच प्रदर्शनास भेट देऊन रील्स बनवून पाठविण्यांसाठीही स्पर्धा आयोजीत केली असल्याची जाहीर करण्यात आले.
प्रारंभी सचिव भुषण भुतडा यांनी स्वागत केले. पाहुण्यांची ओळख जितेंद्र राठी व खुशाल देढिया यांनी करून दिली. सोहळ्याचं सूत्रसंचालन शिवप्रकाश चव्हाण, सतीश मालू यांनी केले. शेवटी तर खजिनदार सुयोग कालाणी यांनी सर्व उपस्थितांचं आभार व्यक्त केले.
याप्रसंगी सहप्रायोजक एमआयटी विश्वप्रयाग युनिव्हर्सिटीचे आकाश स्वामी व सारेगमा कारवाँचे सुयश खानापुरे यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास उपाध्यक्ष सूरजरतन धुत ,सहसचिव हरीष कुकरेजा सह संस्थेचे माजी अध्यक्ष केतन शाह, आनंदराज दोशी, दिलीप राऊत, समीर गांधी, विपीन कुलकर्णी ,जीतेंद्र राठी, कौशिक शाह, खुशाल देढीया, ईश्वर मालू सह संचालक सर्वश्री संदेश कोठारी, राजेश जाजु, चंद्रकांत शाहपुरे, विजय टेके, पवन मुंदडा, सचिन करवा, दत्तात्र्य अंबुरे, जॉय छाबरीया, विश्वजित कुलकर्णी आदी उपस्थित होते.
.............. चौकट ...
... या आहेत सुविधा !
७ दिवस चालणाऱ्या इलेक्ट्रो २०२४ दररोज दु. ४ ते रा. ९.३० व रविवारी स.११ ते रा. ९.३० पर्यंत चालणाऱ्या या प्रदर्शनामध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांचा सहभाग असून एलईडी , फ्रीज , साईड बाय साईड फ्रिज , एअर कंडीशनर, म्युझिक सिस्टीम, वॉशिंग मशीन, डीश टीव्ही , मायक्रोव्हेव ओव्हन, व्हॅक्यूम क्ल{नर, एअर कंडीशनर, सोलर सिस्टिम, गॅस गीझर, मोबाईल, आय पॅड, टेलीफोन, हेल्थ इक्वीपमेंट, कॉम्प्युटर इत्यादी या प्रदर्शनामध्ये उपलब्ध करण्यात आली आहेत. या प्रदर्शनामध्ये ठिकठिकाणी पिण्याच्या शुद्ध पाण्याची सोय करण्यात आलीय.