दक्षिण सोलापूर/संजय पवार : अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांना दक्षिण सोलापूर तालुक्यातील ग्रामस्थांच्या वतीने गावातील विविध मागण्यांसंदर्भातील निवेदन ग्रामपंचायत सदस्य सौ. सुलोचना सखाराम वाघ यांनी बुधवारी, १० जानेवारी रोजी प्रत्यक्ष भेटून सादर केले.
वरळेगांव येथे बस स्टॉप येथे प्रवाशासाठी निवारा शेड उभारणे व शालेय विद्यार्थ्यांना, दिव्यांग विद्यार्थ्यावर पावसाळ्यात येण्या-जाण्यासाठी व अभ्यास करण्यासाठी बैठक खोलीची बांधून मिळावी, वाघ वस्ती ते स्मशानभूमीपर्यंत बंदिस्त गटार बांधून मिळावी, भोसले गल्ली, वाघ वस्ती, काकडे वस्तीमधील अंतर्गत रस्ते आमदार फंडातून करून मिळावी, अशा अनेक सामाजिक समस्या कायमची सुटावी, यासाठी ग्रामपंचायत सदस्य सौ. सुलोचना सखाराम वाघ, व दक्षिण सोलापूर शिवसेना नेते सखाराम वाघ, सुभाष येणगुरे, भाऊ ग्रुप चे छत्रगुन माने, माजी उपसरपंच श्रीमंत हाक्के, क्रांती संघटनेचे अध्यक्ष किशोर चौधरी व इतर ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.
संबंधित निवेदन आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी स्वीकारून योग्य तो निधी तुमच्या गावासाठी देण्यात येईल, असं आश्वासित केले.