सोलापूर : ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यात्रेला काही दिवसांत सुरुवात होत असून त्याच पार्श्वभूमीवर पुष्पागुप्ता दयानंद माॕङेल स्कूलच्या वतीने प्रशालेत नंदीकोल दिंडी मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते.यात विद्यार्थ्यांनी हिरहिरीने सहभाग नोंदवला.
प्रशालेच्या मुख्याध्यापिका यांच्या मार्गदर्शनाखाली या नंदीकोल दिंङीचे आयोजन करण्यात आले होते.या पालखीचे पूजन शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष प्रकाश जाधव ,मारुती सर यांच्या शुभहस्ते करण्यात आले.या पालखी दिंङी सोहळ्यात बालवर्ग ते इ. १ च्या विद्यार्थ्यांचा सहभाग होता.
नंदीकोल दिंङीत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी बाराबंदी घालून 'भक्त लिंग हर्र बोला हर्र, ग्रामदैवत शिवयोगी सिदाधेश्वर महाराज की जय' च्या घोषणांनी परिसर दणाणून सोङला होता. यावेळी मान्यवरांच्या हस्ते ग्रामदैवत शिवयोगी श्री सिदधेश्वर महाराजांची आरती ही पार पडली.या कार्यक्रमास शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.