सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी गावचे माजी सरपंच श्रीशैल विठ्ठल वडजे यांचे शनिवारी, १३ जानेवारी रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते २००१ ते २००५ या काळात बोरामणीचे सरपंच होते. ते मृत्यू समयी ५५ वर्षीय होते.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना असा परिवार आहे. त्यांची अंत्ययात्रा रविवारी, १४ जानेवारी सकाळी ०९ वाजता निघणार असल्याचं सांगण्यात आलंय.