सोलापूर : राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे शनिवारी, 13 जानेवारी रोजी सोलापूर जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
शनिवारी, रात्री 11.00 वाजता सोलापूर येथे आगमन व शासकीय विश्रामगृह येथे मुक्काम. सकाळी 09.00 वाजता शासकीय विश्रामगृह सोलापूर येथून वाहनाने कुंभारी ता.दक्षिण सोलापूर कडे प्रयाण .सकाळी 09.30 वाजता कुंभारी येथेआगमन व प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गतच्या रे नगर गृहनिर्माण प्रकल्प, कुंभारी येथे भेट व आढावा. दुपारी 12.30 वाजता सिध्देश्वर मंदिर येथे आगमन व नंदीध्वज अक्षता सोहळा कार्यक्रमास उपस्थिती.
दुपारी 03.00 वाजता शांतीसागर मंगल कार्यालय, जुने एम्प्लॉयमेंट चौक येथे आगमन व आ. विजय कुमार देशमुख यांच्या आयोजित स्नेहभोजनास उपस्थिती. दुपारी 04.00 वाजता चार पुतळा,हुतात्मा चौक येथे आगमन व जिल्हा वार्षिक योजनेंतर्गतच्या निधीतून विकसित पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुतळा व चार हुतात्मा चौक येथील कामाचे लोकार्पण सोहळयास उपस्थिती. दुपारी 04.30 वाजता सोलापूर महानगरपालिका येथील इंद्रभुवन इमारतीच्या नुतनीकरण कामास सदिच्छा भेट सायंकाळी 05.00 वाजता जामगुंडी मंगल कार्यालय जुळे सोलापूर येथे आगमन व महायुती मेळाव्यास उपस्थिती.
सायं.07.30 वाजता हॉटेल सुर्या, मुरारजी पेठ सोलापूर येथे आगमन व राखीव नंतर सोयीनुसार शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव रात्री 10.15 वाजता सोलापूर रेल्वेस्थानक येथे आगमन व सिध्देश्वर एक्सप्रेस ने मुंबईकडे प्रयाण.