सोलापूर : महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे या सांगोला येथे जिल्हाध्यक्ष दीपकआबा साळुंखे-पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रम आटोपून तुळजापूरला आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी जात असताना सोलापूर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी तुळजापूर नाका इथं आदिती तटकरे यांचं जल्लोषामय स्वागत केलं.
बालविकास योजनेअंतर्गत सोलापूर शहरातील २२ अंगणवाड्या स्मार्ट बनवण्यासाठी निधी मिळावा, यासाठी निवेदन दिलं. त्यावर मंत्री तटकरे यांनी लवकरात लवकर कार्यवाही करून संबंधित अंगणवाड्यांना निधी प्राप्त करून दिला जाईल, असं आश्वासन दिलं.
याप्रसंगी राष्ट्रवादी युवक प्रदेश सरचिटणीस खलील शेख, ज्येष्ठ पदाधिकारी हेमंत चौधरी, आनंद मुस्तारे, अमीर शेख, तनवीर गुलजार, महिला आघाङीच्या शशिकला कस्पटे, लता ढेरे, चित्रा कदम, राजू बेलनावरू, वैद्यकीय विभाग प्रमुख बसवराज कोळी, अनिल बनसोडे, नागेश निंबाळकर, सोशल मिङीया विभाग शहाराध्यक्ष वैभव गंगणे, कार्याध्यक्ष सोमनाथ शिंदे, रियाज शेख, अलमराज आबादिराजे, किरण शिंदे, नवींद पिरजादे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.