सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा मुंबईत गुरुवारी भव्य नारी निर्धार मेळावा होणार असून या मेळाव्यासाठी राज्यातून हजारो महिला पदाधिकारी बुधवारी रात्रीच्या सुमारास राजभरातून मुंबईकङे रवाना झाल्या. राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत व राज्य महीला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या मार्गदर्शनाखाली या भव्य महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर सोलापुरातून मोठ्या संख्येने महिला पदाधिकारी सोलापूरातून मुंबईला रवाना झाल्या.
बसचे पुजन जेष्ठ नेते शफी इनामदार, हेमंत चौधरी, अनिल उकरंडे, तसेच महिला प्रतिनिधि संगीता जोगधनकर, सायरा शेख, लता ढेरे, शशिकला कस्पटे, चित्रा कदम, प्राजक्ता बागल, कविता पाटील, किरण मोहिते, मोनिका सरकार यांच्या शुभहस्ते पुजन करून बस रवाना झाली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहर-जिल्हाध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान, प्रमोद भोसले, युवराज माने शामराव गांगर्डे नागेश निंबाळकर बसवराज कोळी दशरथ शेंडगे, पवन पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.