संभाजी ब्रिगेडच्या संकल्पनेतील श्री राम लल्लाची प्राण प्रतिष्ठापना
सोलापूर : अयोध्या श्रीराम मंदिर प्राण प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त जुळे सोलापुरातील कल्याण नगर येथे हिंदू-मुस्लिम बांधवांनी मिळून श्रीरामाच्या प्रतिमेवर गुलाब पुष्पवृष्टी एकमेकांना शुभेच्छा देऊन आनंद उत्सव साजरा करण्यात आला. सोलापुरात काहीतरी अनुचित प्रकार घडेल, अशी अफवा होती, परंतु गंगा-जमुना ची तहज़ीब अजून जिवंत आहे, हे या हिंदू आणि मुस्लिम बांधवांनी दाखवून दिले.
कल्याण नगर येथे श्रीरामाच्या प्रतिमेचे समाजसेवक विश्वनाथ शेवगांवकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. यावेळी मुस्लिम समाज च्या वतीने श्रीरामाच्या प्रतिमेवर गुलाब पुष्पवृष्टी करण्यात आली. मुस्लिम बांधवांनी हिंदू बांधवांना गुलाब पुष्प देऊन श्रीराम मंदिर प्रतिष्ठापनेच्या शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाचा उद्देश एकच होता की, हिंदू-मुस्लिम समाजामध्ये जातीय सलोखा निर्माण व्हावा, भाईचारा निर्माण व्हावा, समाजामध्ये शांतता एकी राहावी, म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.