मोहोळ : तालुक्यातील ऐतिहासीक गांव असा लौकिकप्राप्त बेगमपूर येथील ' माँ बेगमबी ' साब उर्सला प्रारंभ झाला आहे. या निमित्तानं उद्योजक राजू खरे यांनी, सोमवारी २२ जानेवारी रोजी ' माँ बेगमबी ' दर्गाह मध्ये हजेरी लाऊन त्यांचं दर्शन घेतलं.
उद्योजक राजू खरे यांचं, त्यांच्या समर्थकांनी फटाक्यांच्या आतषबाजीत जंगी स्वागत केलं. त्यानंतर राजू खरे यांनी माँ बेगमबी साब दर्गाहमध्ये जाऊन दर्शन घेतले. यावेळी समाज बांधव व ग्रामस्थांच्या वतीने उद्योजक खरे यांचा फेटा बांधून शाल व पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला.
यावेळी सरपंच प्रकाश सपाटे, सादिक तांबोळी, नेपतगांव सरपंच पांडुरंग परकाळे, उमाकांत करंडे, रंगनाथ गुरव, पांडुरंग डोंगरे, संभाजी धनवले(माजी चेअरमन), गणेश जाधव, समाधान बाबर, विजु खरे, चंदनशिवे सर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते.
उद्योजक राजु खरे यांच्याकडं मोहोळ राखिव विधानसभा मतदारसंघाचे संभाव्य उमेदवार उमेदवार म्हणून पाहिलं जात आहे.