सोलापूर : भारत राष्ट्र समिती पार्टीचे शहर व जिल्हा कार्यकर्त्यांची बैठक शनिवारी सायंकाळी पार्टी कार्यालयाच्या ठिकाणी पार्टीचे जिल्हा समन्वयक माऊली जवळेकर, शहराध्यक्ष दशरथ गोप, ज्येष्ठ नेते नागेश वल्याळ, दक्षिण मतदारसंघाचे नेते सचिन सोनटक्के, बार्शी तालुका समन्वयक संतोष बोरा, मोहोळ तालुक्याचे उमाटे, माजी नगरसेवक संतोष भोसले, उद्योजक जयंत होले-पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.
या बैठकीस शहरातील व ग्रामीण भागातील बहुसंख्य मान्यवर कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. सर्वप्रथम पार्टीचे ज्येष्ठ नेते माजी खासदार स्व. धर्मण्णा सादूल, व पार्टीचे धडाडीचे कार्यकर्ते स्व. शिवशंकर मरगल यांचे अकाली निधन झाले. उभयतांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहून बैठकीस प्रारंभ करण्यात आला.
बैठकीचे प्रास्ताविक करताना, ज्येष्ठ नेते नागेश वल्याळ यांनी शहर अध्यक्ष दशरथ गोप यांचे सोबत हैद्राबाद येथे तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री व पार्टीचे अध्वर्यू केसीआर व प्रमुख नेते हरिष राव यांची भेट घेतली असता, त्यांनी सध्याची राजकीय परिस्थिती व पक्षाच्या पुढील ध्येयधोरणाविषयी कार्यकर्त्यांसाठी दिलेला संदेश व मार्गदर्शनाप्रमाणे जनमानसात पार्टीचा विस्तार करण्यासाठी आपण सर्वजण एकजुटीने काम करण्यासाठी झटले पाहिजे, असे सांगितले.
जिल्हा समन्वयक माउली जवळेकर, संतोष बोरा यांनीसुद्धा सर्वसामान्य जनता, शेतकरी यांच्या हितासाठी झटणारी ही पार्टी असून आपण कार्यकर्त्यांनी जास्तीतजास्त सभासद नोंदणी करून पार्टीचा विस्तार करावयाचे आहे. तुमच्या कामाची दखल नक्कीच केसीआर घेतील, यात शंका नाही.
या व्यतिरिक्त बैठकीत सर्वश्री अनिल बर्वे, सागर कोळी, गणेश खंडाळकर, प्रशांत वायकसकर, मनिष गायकवाड, पाटसकर, अमृत दत्त चिनी आदींनी अनेक सूचना व परखड मत व्यक्त करून यापुढे जनसामान्यांच्या हितासाठी विविध उपक्रमे राबवावे, त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आक्रमकतेने पुढाकार घेऊन काम केले पाहिजे, त्यासाठी प्रसंगी मोर्चा, घेराव,धरणे,आंदोलनं करावी लागतील. तरीही त्यासाठी आपण सर्वांनी तयार असले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
२०२४ लोकसभा निवडणुक लढविण्याचा निर्धारही व्यक्त केला. बैठकीचे समारोप करताना शहराध्यक्ष दशरथ गोप यांनी सर्वांच्या सूचना व मत यांची दखल घेत येत्या २०२४ साठी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी आपण अवश्य विचार करू, यासाठी आपण सर्वांनी लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागावे. आपण लवकरच शहर व ग्रामीण जिल्हा व शहर पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर करणार आहोत, असे सांगून उपस्थित सर्व मान्यवरांचे व कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त केले.
या बैठकीसाठी शहर व ग्रामीण भागातील हाजी शहानवाज शेख,आनंद सिंगराल,श्रीधर चिट्याल, प्रकाश मरगल,भास्कर पसूल, श्रीनिवास गड्डम, विश्वनाथ मेरगु,विजय गुल्लापल्ली यांचेसह बहुसंख्य मान्यवरांची उपस्थिती होती. संदीप वल्याळ, श्री सुकुमार सिद्धम, वेंकटेश मंजुळे, श्रीनिवास नंदाल, श्रीनिवास जक्कन, तिम्मप्पा गडगी, गौतम संगा आदींनी परिश्रम घेतले.