सोलापूर : स्वतःच्या ताब्यातील टाटा कंपनीचा हायवा (क्र एमएच ४२/बी एफ ९६८९) भरधाव गतीने, हयगय आणि निष्काळजीपणाने चालवून पादचाऱ्यास धडक देऊन, त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी सुदाम लिंबाजी भतानी याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आलाय. ही दुर्घटना जुना बोरामणी नाका येथे, गुरुवारी सायंकाळी घडलीय.
गुरुवारी सायंकाळी, जुना बोरामणी नाका चौकाकडे निघालेल्या टाटा हायवाची चालकाच्या निष्काळजीपणामुळं, रस्ता ओलांडत असलेल्या पादचाऱ्यास धडक लागली. त्यात शकिल रहेमान नदाफ (वय-६६ वर्षे, रा-१७६/अ नुराणी मस्जिद जवळ, सोलापूर) हे ज्येष्ठ नागरिक गंभीररित्या जखमी होऊन, त्यांचा जागीच मृत्यू झाला.
याप्रकरणी जेलरोड पोलीस ठाण्याचे पो.कॉ. बालाजी अरूण गायकवाड (ब. न. १६६७) यांनी चालक सुदाम लिंबाजी भतानी (वय-४३ वर्षे, रा- गोडाळगाव, ता. रेणापूर) याच्याविरूध्द फिर्याद दाखल केलीय.
त्यानुसार सुदाम भतानी याच्याविरुद्ध मध्यरात्री गुन्हा दाखल करण्यात आलाय. पो पोलीस उपनिरीक्षक राठोड या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.