सोलापूर : विजापूर रस्त्यावरील निर्मिती लॉंन्स परिसरातील निवारा नगरातील रहिवासी सुलोचना सिद्राम शिंदे यांचे बुधवारी, ०३ जानेवारी रोजी सायंकाळी वार्धक्यात अल्पश: आजाराने निधन झाले. त्या मृत्यूसमयी ८६ वर्षांच्या होत्या.
गुरूवारी, ०४ जानेवारी रोजी सकाळी १० वा. त्यांची अंत्ययात्रा राहत्या घरापासून निघून १०.३० वा. मोदी स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील, असं सांगण्यात आलंय.
त्या अध्यात्मिक तसेच मनमिळाऊ स्वभावाच्या होत्या. त्यांच्या जाण्याने परिसरामध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.त्यांच्या पश्चात १ मुलगा, २ मुली व नातवंडे असा परिवार आहे. त्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील कर्मचारी संजय शिंदे यांच्या त्या मातोश्री होत.