Type Here to Get Search Results !

रविवारी वडाळा येथे पुरस्कार वितरण


उत्तर सोलापूर पत्रकार संघाचे पुरस्कार जाहीर; ०५ मानकरी

उत्तर सोलापूर : उत्तर सोलापूर तालुका पत्रकार संघ व श्रीराम ग्रामीण संशोधन व विकास प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने  पत्रकार दिनानिमित्त तालुक्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनिय काम करणाऱ्या पाच जणांना पुरस्कार देण्यात येणार असून या पुरस्काराचे वितरण वडाळा येथील श्रीराम ग्रामीण संशोधन व विकास प्रतिष्ठानच्या सभागृहात  रविवारी, ०७ सकाळी ११ वाजता एबीबी माझा वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक राजीव खांडेकर यांच्या हस्ते होणार आहे. 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीरामकाका साठे हे असणार आहेत. या कार्यक्रमाला आमदार सुभाष देशमुख, आमदार यशवंत माने, माजी आमदार दिलीप माने, राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलचे अध्यक्ष अविनाश मार्तंडे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शालिवाहन माने-देशमुख, भाजपचे तालुकाध्यक्ष काशीनाथ कदम, शिवसेना (ठाकरे गट) तालुकाध्यक्ष संजय पौळ, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रल्हाद काशीद, सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे यावेळी उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमात पुरस्कारासह तालुक्यातील पाच भूमिपुत्र अधिकाऱ्यांचा विशेष सन्मान केला जाणार आहे. या कार्यक्रमाला उपस्थित रहावे, असं आवाहन उत्तर सोलापूर पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप गायकवाड आणि श्रीराम ग्रामीण विकास प्रतिष्ठानच्या सचिवा डॉ. सौ. अनिता ढोबळे यांनी केलं आहे.

.....चौकट

... यंदाच्या पुरस्काराचे मानकरी

उत्तर सोलापुरातील विविध क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरीबद्दल यंदा कृषि क्षेत्र - अरविंद जाधव (तिर्हे), सामाजिक क्षेत्र - शाहरुख पटेल (हिरज), उद्योग क्षेत्र - सिद्धेश्वर काळे (एस. पी. कंट्रक्शन, नरोटेवाडी), शिक्षण क्षेत्र - सचिन घुगे (कारंबा), पत्रकारिता क्षेत्र - पत्रकार विनोद कामतकर (दै.दिव्य मराठी) आणि महिलांच्या पुरस्कारात कृष्णाबाई त्रिंबक भोसले (कोंडी) यांना गौरविण्यात येतंय.