सोलापूर : समाजसुधारक, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पत्नी, इसवी सन १८४८ मध्ये पुणे येथील भिडे यांच्या वाड्यात पतीच्या मदतीने मुलींची शाळा स्थापन करणाऱ्या स्त्री शिक्षणाच्या जनक, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंतीनिमित्त शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने शहर-जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांच्या शुभहस्ते शहर-जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांच्या पार्क चौक येथील संपर्क कार्यालयात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
यावेळी सोलापूर जिल्हाध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान, जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले, राष्ट्रीय सरचिटणीस अल्पसंख्यांक सेल फारुख मटके, ज्येष्ठ नेते हेमंत चौधरी, सोशल मीडिया कार्याध्यक्ष सोमनाथ शिंदे, नागेश निंबाळकर, तनवीर गुलजार, दशरथ शेंडगे, शामराव गांगर्डे, इरफान शेख, ॲड. नदाफ, महिला पदाधिकारी शशिकला कस्पटे, किरण मोहिते, चित्रा कदम उपस्थित होते.