📖📚
संपूर्ण भारतभर व महाराष्ट्राला क्रांतीसुर्य ज्योतिराव फुले यांची पत्नी म्हणून सावित्रीबाई फुले परिचित आहे. परंतु त्यांचा हा परिचय इतक्या पुरताच मर्यादित नाही. सावित्रीबाईंनी स्वतःच्या म्हणजेच स्व कर्तृत्वाने आपले समाज सुधारण्याच्या क्षेत्रामध्ये वेगळे स्थान निर्माण केले आहे.
मराठी शिक्षण प्रसारक समाजसुधारक सावित्रीबाई फुले यांचा जन्म ३ जानेवारी १८३१ रोजी नायगाव तालुका खंडाळा जिल्हा सातारा या गावी झाला. सावित्रीबाईंच्या आईचे नाव लक्ष्मीबाई, तर वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील होते. खंडोजी नेवसे हे गावचे पाटील होते.
गावचे पाटील असणाऱ्या नेवसे यांचे घराणे हे पेशवे काळातील ईमानदार घराणे होते. घरची परिस्थिती चांगली असल्याकारणाने साहजिकच सावित्रीबाईंचे बालपण अतिशय अतिशय मजेत सुंदर गेले. त्यावेळच्या प्रथेप्रमाणे सावित्रीबाईंचा विवाह सातारा जिल्ह्यातील कटगुन या गावच्या ज्योतिबा फुले यांच्याशी झाला.
त्यावेळी सावित्रीबाईंचे वय अवघे नऊ वर्षांचे होते. तर ज्योतिबा यांचे वय तेरा होते. ज्योतिराव फुले यांचे शिक्षणाकडे विशेष आकर्षक होते. ज्योतिराव इंग्रजीचे शिक्षण घेत असतानाच त्यांचा विवाह दिवस सावित्रीबाई यांच्याशी झाला. सावित्रीबाई यांचा विवाह जेव्हा झाला होता. तेव्हा त्या आपल्या सोबत ख्रिस्ती मिशन-या यांच्या भेटलेले पुस्तक सोबत घेऊन ज्योतिषांच्या घरी आल्या होत्या. त्यावरून ज्योतीरावांनाही एक नवा मार्ग सापडला.
त्यांनी स्वतः शिकून सावित्रीबाईंना शिकवले. सावित्रीबाई फुले या मराठी शिक्षणप्रसारक, समाजसुधारक महिला होत्या. महाराष्ट्रातील स्त्रीशिक्षणाच्या आरंभिक टप्यात त्यांचे पती ज्योतिबा फुले यांच्यासह त्यांनी मोठी कामगिरी बजावली. महात्मा फुले यांच्या समाज सुधारणाच्या कार्यास सावित्रीबाई फुले यांनी मनापासून साथ दिली त्यांच्या कार्यात त्यांनी त्यांच्या बरोबरीने वाटा उचलला. हे कार्य करत असताना वेळप्रसंगी समाजाची निंदा व अवहेलना सुध्दा त्यांनी सहन केली.
१९४८ साली स्त्रीया व अस्पृश्य यांना शिक्षण देणे हा गुन्हा होता. त्या काळात महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांनी १ जानेवारी १८४८ रोजी मुलिंची पहिली शाळा भिडे यांच्या वाड्यात काठली. ०१ जानेवारी रोजी रोजी मराठी मध्ये त्यांनी ही काढलेली शाळा, ही महाराष्ट्रातील पहिलीच मुलींची शाळा होती.
त्या शाळेमध्ये सावित्रीबाई फुले या स्वतः मुख्याध्यापक म्हणून काम पाहु लागल्या. सुरुवातीला त्यांच्या शाळेमध्ये पाच ते सहा विद्यार्थीनी होत्या, पण १८४८ साल संपेपर्यंत ही संख्या ४०-४५ पर्यंत जाऊन पोहोचली. या शाळेची प्रगती पाहुन समाजातील अनेक सनातन्यांनी त्यांचा विरोध केला. अंगावर शेण फेकले. काही उन्मत्तांनी तर अंगावर हात टाकण्याची भाषा केली. घर सोडावे लागेल. अनेक आघात होऊनही सावित्रीबाई डगमगल्या नाही. अनेक संघर्ष करत राहा शिक्षणप्रसाराचा उपक्रम चालूच राहिला.
त्या काळामध्ये बाला-जरठ विवाहप्रथेमुळे अनेक मुली वयाच्या बारा-तेराव्या वर्षी विधवा व्हायच्या. ब्राह्मण समाजात विधवा-पुनर्विवाह अजिबात मान्य नव्हता. पतीच्या निधनानंतर अशा विधवांना सती जावे लागे किंवा मग त्यांचे केशवपन करून कुरूप बनविले जाई. महात्मा फुले यांना आपल्या समाजात विधवा स्त्रियांना भोगावे लागणा-या दुःख यांना पाहुन त्यांच्यासाठी काहीतरी करण्याची गरज वाटू लागली.
अशा दुर्दैवी स्त्रीयांना दिलासा व आधार देण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले यांनी १८६३ मध्ये सुतिकागृह सुरू केले. सावित्रीबाईंने ते समर्थपणे चालविले. सावित्रीबाई फुले यांचा सत्यशोधक समाजाच्या कार्यामध्ये यामध्ये सहभाग असयाचा, ज्योतिरावांच्या निधनानंतर सत्यशोधक समाजाचे कार्य कोणि करायचे असा प्रश्न निर्माण झाला होता, या अशा बिकट परिस्थितीत सावित्रीबाई स्वतः पुढे आल्या आणि महात्मा फुले यांच्या निधनानंतर सत्यशोधक समाजाच्या कार्याची धुरा सांभाळली.
स्त्रीयांनी शिकावे हे त्यांचे बीद्र वाक्य होते.सावित्रीबाईंच्या सामाजिक कार्याबद्दल कॄतज्ञता म्हणून १९९५ पासून ३ जानेवारी सावित्रीबाईंचा हा जन्मदिन हा बालिकादिन म्हणून साजरा केला जातो.सावित्रीबाई फुले या उत्तम लेखिका कवित्री सुध्दा होत्या त्यांनी काव्य फुले बावन कशी सुबोध रत्नाकर इत्यादी साहित्य लिहिले.
१८९६-९७ सालादरम्यान पुणे परिसरात प्लेगची साथ पसरली होती. हा जीवघेणा आजार अनेकांचे जीव घेऊ लागला. या प्लेटच्या साथिमध्ये अनेक लोकांचे हाल व जीव जाऊ लागला.यातुन उभ्दवणारे हाल ओळखून सावित्रीबाईंनी प्लेग पीडितांसाठी पुण्याजवळ वसलेल्या ससाणे यांच्या माळावर दवाखाना सुरू केला. त्या रोगांना व त्यांच्या कुटुंबीयांना आधार देऊ लागल्या .या दरम्यान सावित्रीबाई फुले यांचं १० मार्च १८९७ रोजी निधन झाले.
अशा स्त्री मुक्ती आंदोलनाच्या ख-या अग्रणी माता सावित्रीमाईस विनम्र अभिवादन ... !
'स्त्रीयांच्या जीवनी होता अज्ञानाचा अंधार, क्रांती ज्योती तुम्ही दाविला ज्ञानाचा प्रकाश ! स्त्री शिक्षणाची ज्योत पेटवून केला उध्दार, झेप घेण्या उंच खुले करुन दिले आकाश..!!
हरीदास भिसे, पुणे.