प्रभाग ६ च्या वतीने स्वामींच्या रथोत्सवावर पुष्पवृष्टी !
सोलापूर : गोविंद बोलो हरी गोपाल बोलो, जय श्रीराम,जय हनुमान, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, हरी ओम विठ्ठला असा जयघोष करत, टाळ मृदंगाचा गजर आणि बँजोच्या निनादात श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र आयोध्याचे कोषाध्यक्ष परमपूज्य स्वामी श्री गोविंददेव गिरी महाराज यांची मंगळवारी दमाणी नगरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. शोभायात्रेतील जय श्रीरामचा भगवा ध्वज सर्वांचे लक्ष वेधून घेत होता.
तत्पूर्वी जामश्री मधील श्री हनुमान मंदिरात परमपूज्य गोविंददेव गिरी महाराज यांच्या हस्ते हनुमानाच्या मूर्तीचे पूजन तसेच ग्रंथ पूजन करून शोभायात्रेला प्रारंभ झाला. फुलांनी सजवलेल्या पालखीमध्ये संत श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या प्रतिमेबरोबरच डोईवर कलश घेतलेल्या महिला या शोभायात्रेत मोठ्या भक्तीमय वातावरणात सहभागी झाल्या होत्या.
----------- प्रभाग ०६ मध्ये पुष्पवृष्टी .............
प्रभाग क्रमांक ६ च्या वतीने या प्रभागाचे माजी नगरसेवक आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख गणेश वानकर यांनी सपत्नीक प्रभागाच्यावतीने स्वामी श्री गोविंददेव गिरीजी महाराज यांचेमनोभावे औक्षण करून त्यांचे स्वागत केले.
यावेळी प्रभाग क्रमांक सहा च्या वतीने गोविंददेव गिरीजी महाराज यांच्या रथावर पुष्पवृष्टी करण्यात आली आणि जय श्रीराम चा एकच जयघोष करण्यात आला.
याप्रसंगी संध्या वानकर, ज्योत्स्ना सुपाते, भाग्यश्री मंगळुरे, सुमन रुपनर, दीपिका मनोरे, आशाराणी मोरे, अंबुबाई यमदे, यशोधरा जाधव, सविता डोंगरे, संगीता पाटेकर, सुगलाबाई पाटोळे, कुसुम साठे, सरोज माने, जयश्री पाटील, मीनाक्षी लेंडवे, सोनाबाई गुळवळे, उमा हक्के, मायाबाई साबळे, विमल पवार, कल्पना मसलखांब, सुंदर कांबळे यांच्यासह प्रभाग क्रमांक ०६ मधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.