मोर्चे-आंदोलनाच्या माध्यमातून सामान्यांची दिशाभूल !
सोलापूर : भारतात गेल्या काही वर्षांत आरक्षण आणि अन्य वादग्रस्त विधेयकांबाबत अनेक चळवळींचे नेतृत्व करीत असल्याचे संपूर्ण देशानं पाहिले आहे. हल्ली महाराष्ट्रात जातींमध्ये विशेषतः मराठा, धनगर, ओ.बी.सी. आरक्षणप्रश्नी मोर्चे-आंदोलनं करून वातावरण तापवले जात आहे. या संपूर्ण विषयात सरकारची मानसिकता बदलण्याऐवजी लोकसंख्या मनमानी/दिशाभूल झाल्याचे दिसते, असचं समान नागरी कायद्याचं होत असल्याचे चित्र आहे. त्यासाठी समान नागरी कायद्याऐवजी सन्मान नागरी कायदा लागू करण्याच्या मागणीसाठी रामगौडा चनबसप्पा बिराजदार (प्लाटनं १२२, वैष्णवी नगर, विजापूर रोड, सैफुल, सोलापूर) यांनी शुक्रवारी, ०५ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर बेमुदत उपोषण आंदोलनास प्रारंभ केलाय.
देशातील वा राज्यातील परिस्थितीसंबंधी राज्यकर्त्यांत हतबलता दिसत आहेत. भूतकाळात जे घडले तेच वर्तमान आणि भविष्यात घडताना दिसत आहे.
त्यामुळे एक नागरिक म्हणून माझी विनंती आहे की, केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारे आणि केंद्र सरकारचे मंत्रिमंडळ आणि मान्यवरांच्या सूचना घेऊन किंवा आपल्या ताकदीनुसार, संसदेत तत्सम नागरी/सन्माननीय नागरिक विधेयक मांडावे आणि ते संपूर्ण देशात लागू करावा, अशी रामगौडा बिराजदार यांची मागणी आहे.
याच मुद्द्यावर त्यांनी २६ डिसेंबर रोजीपासून धरणे आंदोलन केले होते, मात्र त्यासंबंधी कोणतीही हालचाल होताना दिसत नसल्याच्या निषेधार्थ, त्यांनी शुक्रवारपासून पुन्हा बेमुदत उपोषणास प्रारंभ केला आहे.