Type Here to Get Search Results !

जिल्हा क्रीडा कार्यालयाचे खो-खो प्रशिक्षण शिबिर सुरु

सोलापूर : जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या  १४ वर्षांखालील मुलींच्या खो-खो प्रशिक्षण शिबिरास नेहरूनगर येथील शासकीय मैदानावर सुरूवात झाली. याचं उद्घाटन जिल्हा क्रीडाधिकारी नरेंद्र पवार, संगमेश्वर कॉलेजचे माजी प्राचार्य धानप्पा मेत्री, समृद्धी स्पोर्टस्‌‍ क्लबचे सचिव संजय सावंत, स्वामी समर्थ अकादमीचे प्रशिक्षक रवी राठोड, सोलापुर ॲम्युचर खो-खो असोसिएशनचे सचिव ए. बी. संगवे, संतोष कदम, सोनाली शिंदे, गणेश कुडले, गौरीशंकर कोनापुरे, शेखलाल शेख यांच्या उपस्थितीत झाले.

शिबिरातील सहभागी खेळाडूंना दररोज सकाळी अल्पोपहार देण्यात येत असून हे शिबिर विनामूल्य आहे. या शिबिरास तालुका क्रीडाधिकारी सत्येन जाधव, क्रीडाशिक्षक पुंडलीक कलखांबकर, माजी राष्ट्रीय खो-खो खेळाडू सुनील चव्हाण व राजाराम शितोळे यांचे मार्गदर्शन लाभत आहे.

या शिबिरास शहर व जिल्ह्यातील  निवडक ५० खेळाडूंना प्रशिक्षण देण्यात येत आहे.  हे शिबिर ५ फेब्रुवारीपर्यंत सुरु आहे. या शिबिरास सोलापूर ॲम्युचर खो-खो असोसिएशन व समृद्धी स्पोर्टस्‌‍ सहकार्य लाभत आहे.