Type Here to Get Search Results !

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना अभिवादन

 

सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रैस पार्टीच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त मंगळवारी, ३० जानेवारी रोजी रेल्वे स्टेशन चौक परिसरात, महात्मा गांधी यांच्या पुर्णाकृति पुतळ्याजवळ अभिवादनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी ज्येष्ठ नेते शफी ईनामदार, अनिल उकरंडे यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पित करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी 'अमर रहे, अमर रहे, महात्मा गांधी अमर रहे ' च्या घोषणांनी परिसर दणाणला होता. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी देशासाठी दिलेले बलिदान, त्याग आणि त्यांचे विचार अजरामर राहतील, असे प्रतिपादन यावेळी ज्येष्ठ नेते शफी ईनामदार व अनिल उकरंडे यांनी व्यक्त केलं.

याप्रसंगी शहर-जिल्हाध्यक्ष संतोष  पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान, ज्येष्ठ नेते शफी ईनामदार, अनिल उकरंडे, फारुक मटके, प्रमोद भोसले, अमिर शेख, राजू बेळेनौर, संजय मोरे, अनिल बनसोडे, तन्वीर गुलजार, रुपेश भोसले, वैभव गंगणे, छत्रबंद, पवन पाटील, शामराव गांगर्डे, सोमनाथ शिंदे, दत्ता वाघमोडे, यशराज ङोळसे, ओम सपकाळे, दशरथ पवार, मार्तँड शिनगारे, किरण भीषेकर, संजय सांगळे, महीला अध्यक्ष संगीता जोगधनकर कार्याध्यक्ष कदम, सायरा शेख, शशिकला कस्पटे, किरण मोहोते, विनायक कदम, शंकर पुजारी यांची उपस्थिती होती.