सोलापूर : दक्षिण तालुक्यातील लिंबे चिचोळी येथील श्री.रेवणसिध्देश्वर प्रशालेत प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने वार्षिक स्नेहसंमेलन अत्यंत उत्साहात झाले.
या कार्यक्रमासाठी गावचे सरपंच सौ.गीतांजली माळी, उपसरपंच संतोष हक्के, शालेय समितीचे सदस्य सिध्देश्वर नरोळे व ग्रामपंचायत सदस्य,गावकरी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरूवात सरपंच सौ.गीतांजली माळी यांच्या हस्ते ध्वजारोहण व प्रतिमा पूजन करून झाली. प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी यावेळी ध्वजगीत, देशभक्ती पर गीत सादर करून उपस्थितांचे मनोरंजन केले. याप्रसंगी प्रशालेच्या वतीने दर वर्षी देण्यात येणारा आदर्श विद्यार्थी पुरस्कार इयत्ता १० वी मधील विद्यार्थी चि.अमित प्रकाश रजपूत आणि कु.लक्ष्मी चंगळेपा मुंडासे यांना प्रदान करण्यात आला.
प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ.देगांवकर यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार एन.टी.बिराजदार यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशालेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.