प्रजासत्ताक दिनी २८ मॅचेस यशस्वीपणे पूर्ण
सोलापूर : भारतीय प्रजासत्ताक दिनी सोलापूरचे उद्योगपती श्रीनिवास बी. सोनी पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित लॉन टेनिस टुर्नामेंटचे उदघाटन मातोश्री श्रीमती शीलादेवी श्री. सोनी यांच्या हस्ते श्रीनिवासजी सोनी यांच्या प्रतिमेचे आणि दीपप्रज्वलन करून दि. २६ जानेवारी रोजी सकाळी ७ वाजता ऑफिसर्स क्लबच्या टेनिस कोर्टवर करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते नेटचे पूजन करून हवेत फुगे सोडण्यात आले. यावेळी सुहास सोनी, विकास सोनी, अनुराधा गांधी, डॉ.शंतनु गांधी आणि सोनी परिवार उपस्थित होते.
प्रारंभी राष्ट्रगीताने या कार्यक्रमाची सुरूवात झाली. त्यानंतर विकास सोनी यांनी या टेनिस स्पर्धेच्या आयोजनाबाबतची माहिती दिली त्यानंतर डॉ.शंतनु गांधी यांनी मॅचेस कशा खेळल्या पाहिजेत याबाबत मार्गदर्शन केले. नंतर पुण्याहून आलेल्या मुख्य रेफरी तेजल कुलकर्णी यांनी या स्पर्धेबाबतचे नियम सांगितले आणि स्पर्धेला सुरूवात झाली.
या स्पर्धेत मायटी मॅशर्स, संचेती स्ट्रायकर, आर पी वॉरियर्स आणि टेनिस किंग्ज या चार टिम मध्ये स्पर्धा सुरू करण्यात आल्या पहिल्या दिवशी २८ मॅचेस खेळवण्यात आले. यामध्ये पुढीलप्रमाणे विजेते ठरले.
६५ ते ८५ वयोगटातील डॉ.बाहुबली दोशी, डॉ. भारत मुळे या जोडीने डॉ. दिलीप शहा आणि डॉ. लब्बा यांच्यात एक तासाचा अटीतटीचा सामना झाला त्यामध्ये डॉ.दोशी आणि मुळे यांनी ६-५ ने पराभव केला.
गोल्ड कॅटेगरी मध्ये विकास सोनी, किरण किणीकर यांनी अमित गांधी शैलेंद्र सुराणा यांचा ६-२ने पराभव केला.
अमोल संचेती व कुमार रव्वा यांनी प्रितेश चिट्टे व समीर देशपांडे यांचा ६-४ने पराभव केला. महेश बाकळे व साहिल शहा यांनी राहुल कटारे व आकाश कटारे यांचा ६-४ ने पराभव केला.
सिल्वर व ब्रॉन्ज कॅटेगरीत - राजेश दर्बी व आशिश हुंडेकरी यांनी सिद्राम बुरा व सादिक करचे यांचा पराभव केला.
संदेश लोणावत व राधिका मालु यांनी विनित बिराजदार यांचा ६-५ने पराभव केला. संतोष पत्तठक व विनित बिराजदार यांनी राजेश मुळगे व संगमनाथ नागोजी यांचा पराभव केला.
आहाना गांधी व योगेश लाहोटी यांनी हेमंत शहा व सतीश कोल्हापुरे यांचा पराभव केला. मार्श घाटे व सन्मीत हरिहर यांनी मीरा पटवर्धन व आर्यमन गांधी यांचा पराभव केला. या स्पर्धा अत्यंत चुरशीच्या झाल्या यामध्ये १३ वर्षीय आहाना ने अत्यंत चमकदार कामगिरी करून प्रेक्षकांना चकीत केले.