सोलापूर : हातचलाखीने महिलेची फसवणूक करून तिचे सोन्याचे दागिने नेल्याप्रकरणी सदर बझार पोलिसांकडील दाखल गुन्ह्यात गुन्हे शाखेच्या पथकाने २ आंतरराज्य आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्या झाडाझडतीत ३२ ग्रॅम सोन्याचे दागिणे आणि एक मोटारसायकल हस्तगत करण्यात आलीय. त्यांच्या ताब्यातून २.२२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याचे सांगण्यात आलंय.
उत्तर सदर बझार परिसरातील आनंद विणकर सोसायटीतील रहिवासी सौ. सावित्री नागनाथ बोगा ( वय-५५ वर्ष) व त्यांची सुन सौ. किर्ती, सकाळी ११.३० वा चे सुमारास घरासमोर भांडी घासत होत्या. त्यावेळी पितांबरी च्या जाहिरातीसाठी आल्याचे सांगून दोन अनोळखी इसमांनी प्रारंभी बर्तन, पैंजण चमकावून दिले. त्यानंतर सोन्याचे दागिने पॉलिश करून देतो असे म्हणून सोन्याचे दागिने घेतले. ते हात चलाखीने स्वतःकडे ठेवून प्लॅस्टिकच्या पिशवी लहान दगड गुंडाळून ती त्यांच्या हाती दिली. काही वेळानंतर ते उघडून पाहिले असता, त्यात दगड असून सोन्याचे दागिने गायब झाल्याने त्यांची फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी सौ. सावित्री बोगा यांनी फिर्याद दाखल केली होती.
या संदर्भात माहिती मिळतात गुन्हे शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर व पथकाने घटनास्थळी माहिती व वर्णन घेऊन सलग बारा दिवस अथक परिश्रम घेतल्यानंतर तांत्रिक विश्लेषणाचे आधारे काही माहिती प्राप्त केली. त्यानंतर, ती प्राप्त माहिती आणि बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे, २० जानेवारी रोजी, सिध्दार्थ चौक येथून विनोद रामजी भगत (वय-३८ वर्ष, व्यवसाय-मजुरी रा. गाव-लतरा, जि.भागलपूर, राज्य बिहार), व दिपककुमार जवाहर यादव (वय-२८ वर्ष, रा. गाव जदीया, तालुका त्रिवेनीगंज, जि. सुपौल राज्य-बिहार) या दोघांना ताब्यात घेतले. त्
त्यांचेकडे Bhaiyya CLEANING POWDER, पॉलीश करण्याचे लहाण व मोठे असे एकुण ०७ लाकडी ब्रश, छोटे पिशव्याचे पाऊच, Pitambari Rooperi ची बाटली, छोटा चिमटा, प्लॅस्टीक ची दोन छोटी टोपली व ०५ छोटया बकेट, तुरटी, हळद पावडर, Shampoo ची पुडी असे साहीत्य मिळुन आले.
सपोनि/संजय क्षिरसागर व त्यांचे तपास पथकाने, वर नमूद दोन इसमांकडे कौशल्यपुर्वक तपास केला असता, त्यांनी वरील प्रमाणे दाखल गुन्हा केल्याचे कबुल केले. त्यानंतर त्यांचेकडून, वरील दाखल गुन्हयात फिर्यादी यांची फसवणुक करून घेऊन गेलेले एकूण ३२ ग्रॅम सोने, ०१ मोटर सायकल व गुन्हा करण्यासाठी लागणारे साहीत्य असा एकुण २,२२,२०६ रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करून सदरचा गुन्हा उघडकीस आणला.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त डॉ. श्री. राजेंद्र माने, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) डॉ. दीपाली काळे, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) श्रीमती प्रांजली सोनवणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुनिल दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली, स.पो.नि./संजय क्षिरसागर, अनिल जाधव, राजु मुदगल, महेश शिंदे, कुमार शेळके यांनी केली. या कामात त्यांना, दिलीप किर्दक, प्रकाश गायकवाड, अविनाश पाटील, सिध्दाराम देशमुख, अजय गुंड, बाळु काळे, सतिश काटे यांनी मदत केली.