सोलापूर : भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त कायनात बहुउद्देशीय सामाजिक संस्था आणि लोकशाही फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी, २६ जानेवारी रोजी नई जिंदगी परिसरातील भीमाशंकर नगर कायनात चौक येथे मतदार नोंदणी व नेत्र चिकित्सा शिबीराचं आयोजन करण्यात आलं होतं. नेत्र चिकित्सा शिबीराचा २०० हून अधिक रूग्णांची तपासणी करण्यात आली.
प्रजासत्ताक दिनी, भीमाशंकर नगर कायनात चौकात आयोजित शिबीराचा प्रारंभ कायनात बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष अशफाक निटोरे, उपाध्यक्ष रईस शेख, सचिव इलियास शेख, लोकशाही फाऊंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष तथा नेत्र चिकित्सा तज्ञ वसीम राजा बागवान यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
नेत्र चिकित्सा तज्ञ वसीम राजा बागवान व त्यांच्या टीमने २०० हून अधिक नागरिकांची नेत्र तपासणी केली. त्यातील गरजू १०० जणांना लोकशाही फाउंडेशनकडून चष्म्याची फ्रेम मोफत देण्यात आली. २५ लोकांना मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्याचे कार्ड बनवून देण्यात आले.
याप्रसंगी मोइनुद्दीन शेख, अल्ताफ अत्तार, मतीन मटकी, सिराज शेख, समीर अंबिलखिचडे, फैयाज इनामदार, अनवर मूर्तृवाले, अरबाज शेख, आमिर निटोरे, रहेमान अल्लोळी, इसाक शेख, मौला इनामदार, समीर सय्यद यांच्यासह भीमाशंकर नगर कायनात मोहल्लाचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.