सोलापूर : "देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेकांनी हौतात्म्य पत्करले, आपल्या जीवाची बाजी लावली ते स्वातंत्र्य टिकायला हवे, संविधानाने बहाल केलेली शाश्वत मूल्ये, आपले हक्क- अधिकार आपण प्राणपणाने जपायला हवीत' असे वक्तव्य सर्वधर्मीय संविधान जागर परिषदेत सुप्रीम कोर्टाचे ख्यातनाम वकिल तैवरखान पठाण यांनी केले.
"संविधानाचे रक्षण म्हणजेच आपल्या हक्कांचे रक्षण, आपल्या देशाचे रक्षण होय. त्याला नख लावण्याचा डाव आपण हाणून पाडू या.. संविधान रक्षणासाठी तन-मन-धनाने सहभागी होऊ या.. बोला तुम्ही तयार आहात काय?" असा सवाल ॲड. तैवरखान पठाण यांनी करताच, प्रचंड संख्येने उपस्थित जनसमूहाने त्यास होकार देत तितक्याच उत्फुर्तपणे त्यांना हात उंचावून प्रतिसाद दिला.
सोलापुरातील विजापूर वेस येथे प्रजासत्ताक दिनी पार पडलेल्या सर्वधर्मीय संविधान जागर परिषदेचे आयोजन जमियत उलेमा-ए-हिंदने केले होते. सदर परिषदेचे अध्यक्षस्थान संस्थेचे अध्यक्ष मौलाना हारिस ईशाअती यांनी भूषविले.
यावेळी भंते बी.सारीपुत्त यांनी संविधान निर्मितीचे मर्म विशद केले. तर सोलापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. सुरेशबापु गायकवाड यांनी या मोहिमेत आपण सोबत आहोत याची ग्वाही दिली.
न्यु चर्चचे रेव्ह. राजू आरेपाग यांनी समयोचित संबोधन केले. आंबेडकर युथ असोसिएशनचे संस्थापक उत्तम भैय्या नवघरे यांनी 'ईव्हीएम हटाव' मोहीमे अंतर्गत मीस्ड्कॉल कॅम्पेनची माहिती दिली. त्यासरशी शेकडो नागरिकांनी प्रतिसाद देत आपले कर्तव्य बजावले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे जनरल सेक्रेटरी हसीब नदाफ व मौलाना तैय्यब कासमी यांनी केले. कुरान पठान कारी ईद्रीस मंगलगीरी यांनी केले, तर आभार प्रदर्शन हाफिज युसूफ यांनी केले. मंचावर हाफिज अ.हमीद चांदा, हाफिज महेमूद, मौलाना मैनोद्दीन, मुफ्ती गौस, अय्यूबभाई मंगलगीरी, अ.रशीद आळंदकर आदी उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बलिदान सामाजिक संस्थेचे मंजूरमामा बागवान, अशपाक बागवानमेंबर, युनूस डोणगांवकर, हाजी अ.सत्तार दर्जी, म.युसूफ प्यारे, अ.मजिद गदवाल, डॉ. ए. एम. शेख, मुश्ताक ईनामदार, अ.शुकूर खलिफा, हाफिज तौसिफ यांनी विशेष परिश्रम घेतले.
संविधान जिंदाबाद, प्रजासत्ताक दिन चिरायू होवो, आदी घोषणांच्या निनादात परिषदेची सांगता झाली.