धाराशिव : समाज कल्याण विभाग,जिल्हा परिषद,धाराशिव यांच्या वतीने आयोजित जिल्ह्यातील दिव्यांगांच्या विशेष शाळा व कार्यशाळेतील मुलां-मुलींच्या आयोजित क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत लोहारा तालुक्यातील सास्तूर येथील श्री शांतेश्वर दिव्यांग व्यावसायिक प्रशिक्षण केंद्रातील स्पर्धक खेळाडूंनी दमदार कामगिरी करत ०८ सुवर्ण, ०८ रजत व ०६ कांस्य पदकाची कमाई करत दोन्ही स्पर्धेत अव्वल स्थान मिळविले.
२० व २१ डिसेंबर दरम्यान धाराशिव येथील तुळजाभवानी स्टेडियम व छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात आयोजित स्पर्धेत जिल्ह्यातील दिव्यांगाच्या शाळेतील ८०० पेक्षा अधिक स्पर्धक खेळाडूंनी सहभाग घेतला होता. स्पर्धा समारोपानंतर स्पर्धेतील विजेत्या संघाला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
या स्पर्धेत सुवर्ण पदक विजेते खेळाडूंना आगामी काळात होणाऱ्या राज्यस्तरीय दिव्यांग मुलां-मुलींच्या क्रीडा स्पर्धेत धाराशिव जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे.
वाघमारे रोहित सचिन, वरवटे दिनेश मदन, गायकवाड राज संभाजी, मोरे ओमकार विठ्ठल, कु.घोसले रुपा तुकाराम, कु.बेळे सोनाली शेखर या खेळाडूंनी सुवर्णपदक पटकाविण्याचा मान मिळवला. सुतार प्रज्वल सुभाष, धानुरे अभिषेक शिवाजी, कोळी खंडू नरसिंग, पटेल फैज खाजा, कु.नाईक साक्षी लक्ष्मण, कु. घोसले रुपा तुकाराम, कु.साळुंके ऋतुजा बालाजी आणि सुर्यवंशी पूजा इंद्रजित हे खेळाडू रजत पदक विजेते ठरले.
येणगे इंद्रजित व्यंकट, पाटणकर उमेश दिलीपराव, धानुरे अभिषेक शिवाजी, सुतार प्रज्वल सुभाष, कु.गोडगे कोमल शिवराज, कु.बेळे सोनाली शेखर हे खेळाडूं कास्यं पदकावर आपलं नांव कोरण्यात यश आलंय. संस्थेच्या सचिव निर्मला बदामे, मुख्याध्यापक बालाजी नादरगे, प्राचार्य भरत बालवाड यांनी सर्व यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन केलंय.