शुक्रवारी 'टिपू सुलतान' पत्रसार संग्रह ग्रंथाचे प्रकाशन
डॉ. राम पुनियानी, राजू परुळेकर यांची प्रमुख उपस्थिती
सोलापूर : मुस्लिम इतिहास आणि संस्कृतीबद्दल पसरवले जाणारे द्वेष रोखण्याचा प्रयत्न येथील गाझिउद्दीन रिसर्च सेंटर करत आहे. या मालिकेत सरफराज अहमद आणि सय्यद शाह वाएझ यांनी टिपू सुलतान याच्या विविध क्षेत्रातील कामगिरीचा आढावा घेणाऱ्या टिपू सुलतान पत्रसार संग्रह या ग्रंथाचे प्रकाशन शुक्रवारी, ०८ डिसेंबर रोजी सायंकाळी ०६ वा. डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहात करण्यात येत आहे. यावेळी डॉ. राम पुनियानी(मुंबई) आणि राजू परुळेकर (मुंबई) यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असल्याचे रिसर्च सेंटरच्या वतीने सांगण्यात आले.
टिपू सुलतान यांच्या उद्योग, अर्थकारण, साहित्य, तत्वज्ञान, वैद्यकीय क्षेत्रातील कामगिरीचा आढावा घेणाऱ्या टिपू सुलतान पत्रसार संग्रहात पाचशे पत्रांचा संग्रह मराठी भाषेत आहे. तत्पूर्वी राम पुनियानी यांनी भाजप आणि आरएसएसवर एक महत्त्वाचे पुस्तक लिहिले आहे. रसम-ए-इजरा आणि या दोन पुस्तकांच्या विषयांवर डॉ. राम पुनियानी यांचं ' मुस्लिम आणि टिपू सुलतानची तारीख बदनामी: फॅसिस्ट षड्:यंत्र ' या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
या प्रकाशन सोहळ्याला मौलाना जबीउल्ला, के बी. नदाफ आणि नासिर अहमद खलिफा यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असून आसिफ इक्बाल या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. यावेळी नागरिकांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे, असे आवाहनही गाजीउद्दीन रिसर्च सेंटरच्या वतीने करण्यात आलं आहे.